Sunday, July 6, 2025
dainiktarunbharat.com
Advertisement
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • वृत्तवेध Youtube
  • वृत्तवेध Channel
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

हॉल तिकीटावर आजची तारीख अन् परीक्षा कालच झाली! नाशिकमधील धक्कादायक प्रकार….

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
April 26, 2023
in maharashtra
0
हॉल तिकीटावर आजची तारीख अन् परीक्षा कालच झाली! नाशिकमधील धक्कादायक प्रकार….
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नाशिकमध्ये बीएड सीईटी (B.Ed CET) परीक्षेसंदर्भात मोठा गोंधळ उडाला असून विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावर आज परीक्षा होती. मात्र ज्यावेळी विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहोचले, त्यावेळी परीक्षा तर कालच झाल्याचे महाविद्यालयत परीक्षा केंद्राकडून सांगण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे धाबे दणाणले. यावेळी युवक काँग्रेस आणि शिक्षक आमदार सत्यजीत तांबे  यांच्या पाठपुराव्यानंतर या विद्यार्थ्यांना दोन महाविद्यालयात परीक्षेसाठी हलवण्यात आल्याचे समजते.

एकीकडे राज्यात स्पर्धा परीक्षांसह इतर परीक्षा देण्यासाठी विद्यार्थी जीवाचं रान करत आहेत. मात्र दुसरीकडे स्पर्धा परीक्षा आयोजकांकडून भोंगळ कारभार समोर येत असल्याचे दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वी एमपीएसी विद्यार्थ्यांची हॉल तिकिटे सोशल मीडियावर लीक झाल्याची घटना घडली होती. आता बीएड सीईटी संदर्भात गोंधळ उडाला आहे. नाशिकमध्ये एका केंद्रावर परीक्षेसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा कालच झाल्याचे समजल्यानंतर त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. दुसरीकडे विद्यार्थ्यांकडे असलेल्या प्रवेशपत्रांवर मात्र आजची तारीख असल्याने विद्यार्थी संभ्रमात पडले.

सत्यजीत तांबेंकडून पाठपुरावा, विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी दोन महाविद्यालयात पाठवले
नाशिकच्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयात आज सकाळी 9 ते 10.30 वाजेच्या दरम्यान बीएडसाठी प्रवेश पूर्वपरीक्षा आयोजित करण्यात आली होती. मात्र हॉल तिकीटावर आजची तारीख देण्यात आलेली असताना परीक्षा केंद्रावर काल परीक्षा होऊन गेल्याचं महाविद्यालयाकडून सांगण्यात येताच इथे एकच गोंधळ उडाला होता. युवक काँग्रेस आणि शिक्षक आमदार सत्यजीत तांबे यांच्या पाठपुराव्यानंतर या विद्यार्थ्यांना दोन महाविद्यालयात परीक्षेसाठी हलवण्यात आले. आज सकाळी 11 वाजता JMCT आणि JET महाविद्यालयात ही परीक्षा होणार आहे. या सर्व गोंधळामुळे विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला असून हे विद्यार्थी नंदुरबार जिल्ह्यातून जवळपास दोनशे ते अडीचशे किलोमीटर अंतरावरुन नाशिकमध्ये येऊन पोहोचले होते. दरम्यान शासनाचे ऑनलाईन एक्झाम घेण्याचे कंत्राट ज्या EDU SPARK कंपनीकडे आहे. तिच्यावर कारवाईची मागणी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.

सीईटी सेलकडून स्पष्टीकरण, सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा होणार…

दरम्यान विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीट वर आजची 26 तारीख असून बीएड सीईटीची परीक्षा मात्र कालच झाल्याचे केंद्राकडून सांगण्यात आले. आज सकाळी नऊ वाजेपासून ते अकरा वाजेपर्यंत ही परीक्षा होणार होती. नाशिकसह जिल्हाभरातून आणि धुळे, नंदुरबार, जळगाव आधी परिसरातून नाशिकला विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी आले होते. तसेच नागपूरच्या परीक्षा केंद्रावरही असाच गोंधळ झाला असून विद्यार्थ्यांचे धाबे दणाणले आहेत. बीएड सीईटी सेलचा कारभार समोर आल्याने विद्यार्थी चांगले संभ्रमात पडले आहेत. या पार्श्वभूमीवर सीईटी सेलकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. ते म्हणाले की, विद्यार्थ्यांचे केंद्र बदलले असल्याचा मेसेज विद्यार्थ्यांना पाठवण्यात आला होता. मात्र विद्यार्थी जुन्या हॉल तिकिटावर असलेले परीक्षा केंद्र पाहून परीक्षेसाठी गेले. दरम्यान अशा सर्व उमेदवारांना जीएस रायसोनी, नागपूर परीक्षा केंद्रावर रिपोर्ट करण्यास सांगण्यात आले आहे. सर्व उमेदवारांना सामावून घेतले जात असल्याचे म्हटले आहे. हॉल तिकीटावर कुठलीही तारीख असली तरीही आज ज्या दिवशी ज्या उमेदवारांची परीक्षा नियोजित होती त्यांची परीक्षा वेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर घेतली जाईल. ज्या कंपनीमार्फत ही ऑनलाईन परीक्षा घेतली जाते त्या कंपनीला कारणे दाखवा नोटीस पाठवली असून यासंदर्भात कारवाई केली जाईल.

Previous Post

सौराष्ट्र-तामिळ संगम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाष्य….

Next Post

सर्वात प्रेरणादायी बॉडीबिल्डर होण्यासाठी त्याने सर्वस्वाचा त्याग केला….

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
सर्वात प्रेरणादायी बॉडीबिल्डर होण्यासाठी त्याने सर्वस्वाचा त्याग केला….

सर्वात प्रेरणादायी बॉडीबिल्डर होण्यासाठी त्याने सर्वस्वाचा त्याग केला....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विमान अपघातात प्राण गमावलेल्या नागरिकांना भारत-इंग्लंड संघांनी वाहिली श्रद्धांजली

विमान अपघातात प्राण गमावलेल्या नागरिकांना भारत-इंग्लंड संघांनी वाहिली श्रद्धांजली

June 20, 2025
‘भारत आता फक्त विचार करत नाही, दिशा देखील ठरवतो – पंतप्रधान नरेंद्र मोदी

‘भारत आता फक्त विचार करत नाही, दिशा देखील ठरवतो – पंतप्रधान नरेंद्र मोदी

April 1, 2025
महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी मल्टीमीडिया प्रचाराचा उपयोग जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे यांचे प्रतिपादन

महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी मल्टीमीडिया प्रचाराचा उपयोग जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे यांचे प्रतिपादन

March 22, 2025
मोमीन शेख निसार महेबूब यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न

मोमीन शेख निसार महेबूब यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न

March 3, 2025
मुदखेड येथील तिसरी बौद्ध धम्म परिषद मोठ्या उत्साहात संपन्न

मुदखेड येथील तिसरी बौद्ध धम्म परिषद मोठ्या उत्साहात संपन्न

March 3, 2025
वादग्रस्त सायफळ वाळू घाट पुन्हा काढला खोदून

वादग्रस्त सायफळ वाळू घाट पुन्हा काढला खोदून

March 3, 2025
धुळे : घरफोडी करणा-या अट्टल चोराला धुळे तालुका पोलीसांनी ताब्यात घेतले

पंकज नगरात घरफोडी; रोख ५ हजार रूपयांसह लाखोंचे दागिने चोरून नेले

March 3, 2025
लिफ्ट मागण्याच्या बहाण्यानं दुचाकीवर बसलेल्या महिलेनं एका पिग्मी एजंटला २५ हजार रुपयांना लुटलं….

रात्री दोन दुकाने चोरट्यांनी फोडल्या मुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले

March 3, 2025

फेसबुक पेज

मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 10, 2024
0

मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 26, 2024
0

मुंबई, 26 जून (हिं.स.) विधात्याने तळहातावर रेखाटलेली आयुष्यरेखा आपण वाढवू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर देणारा 'लाईफ लाईन' चित्रपट येत्या...

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 23, 2024
0

मुंबई, 23 जून (हिं.स.) : IMDb (www.imdb.com) ह्या मूव्हीज, टीव्ही आणि सेलिब्रिटीजवरील माहितीच्या जगातील सर्वांत प्रसिद्ध व विश्वसनीय स्रोताने आज...

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 21, 2024
0

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका 'ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत' मुंबई, 21 जून (हिं.स.) : ‘बडे अच्छे लगते...

इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर

इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 21, 2024
0

मुंबई, 21 जून (हिं.स.) : रियालिटी टीव्हीच्या अपेक्षा उंचावत सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनचा स्वतःचा फॉरमॅट असलेला शो इंडियाज बेस्ट डान्सर आपला...

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 19, 2024
0

अनेकदा एखादा मराठीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट गाजल्यानंतर त्याची तुलना हिंदी सिनेइंडस्ट्रीसोबत होते. अनेकदा मराठी सिनेइंडस्ट्रीमधील उणीवा अथवा जमेची बाजू...

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 17, 2024
0

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक  समोर आलाय. हा चित्रपट मराठी नाही तर दक्षिणेतील चित्रपट...

Load More

राजकीय

ठाण्यात शिवसेनेने काढली पवित्र संविधानाची दिंडी

ठाण्यात शिवसेनेने काढली पवित्र संविधानाची दिंडी

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
January 26, 2025
0

ठाणे, 26 जानेवारी (हिं.स.)। एकवेळ मरण पत्कारू पण संविधान बदलू देणार नाही असा नारा देत ठाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या : बंजारा समाजाची मागणी

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या : बंजारा समाजाची मागणी

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
November 30, 2024
0

देगलूर / प्रतिनिधी महाराष्ट्रातील समस्त बंजारा समाजाचे नेते तसेच दिग्रस विधानसभा मतदार संघाचे विध्यमान आमदार संजय राठोड यांना राज्याचे उपमुख्यमंत्री...

झारखंड : झामुमो आणि इंडी आघाडीला बहुमत 

झारखंड : झामुमो आणि इंडी आघाडीला बहुमत 

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
November 23, 2024
0

रांची, 23 नोव्हेंबर (हिं.स.) : झारखंड विधानसभा निवडणुकीच्या आज, शनिवारी जाहीर झालेल्या निकालात झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो) आणि इंडी आघाडीला...

बार्शी विधानसभा २४६ मधील सकाळी ७ ते ९ मध्ये झालेले मतदान.

22 फेरी सुभाष देशमुख 58 हजार 27 मतांची आघाडी

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
November 23, 2024
0

22 फेरी सुभाष देशमुख 58 हजार 27 मतांची आघाडी सुभाष देशमुख 94 हजार754 अमर पाटील 36हजार 724हजार

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वृत्त संग्रह

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • वृत्तवेध Youtube
  • वृत्तवेध Channel
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group