सोलापूर : भावसार व्हिजन इंडिया, सोलापूरच्या वतीने आयोजित मेगा प्रोजेक्ट – शिष्यवृत्ती वितरण समारंभ व मासिक सभा दमानी ब्लड बँकेवरील सभागृह, डफरीन चौक येथे उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाली. या उपक्रमांतर्गत २५ गरजू व होतकरू भावसार विद्यार्थ्यांना प्रत्येकी ₹६,००० प्रमाणे एकूण ₹१,५०,००० ची शिष्यवृत्ती मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमास राष्ट्रीय अध्यक्ष श्री. मनीष सूत्रावे, उद्योगपती श्री. धीरज जवळकर, २०२७ चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. शिवाजी उपरे तसेच २०२७ चे राष्ट्रीय सचिव श्री. गिरीश पुकाळे,एरिया गव्हर्नर श्री श्रीराज निकते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, जिद्द, परिश्रम आणि समाजाप्रती कर्तव्य याबाबत प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
प्रास्ताविकात क्लब अध्यक्ष श्री. आशिष जवळकर यांनी संस्थेच्या शैक्षणिक उपक्रमांची माहिती देत, समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वी होत असल्याचे सांगितले. सचिव श्री. हर्षल माळवदकर यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात सर्वांनी दिलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन श्री. निशिकांत पुकाळे व श्री. सुहास राशिनकर यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिष्यवृत्ती देणारे सर्व दानशूर, उपस्थित संचालक, सदस्य, पालक, विद्यार्थी, समाजबांधव, स्वयंसेवक व सर्व सहकाऱ्यांचे अध्यक्ष श्री. आशिष जवळकर यांनी मनःपूर्वक आभार मानले. या उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला नवी दिशा व प्रेरणा मिळाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली



















