पिलीव – माळशिरस तालुक्यातील पिलीव येथुन पंढरपूर येथील आषाढी एकादशीनिमित्त जवळपास 25 पालख्यांचा मुक्काम पिलीव येथे असतो .यानिमित्त
राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ‘भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ या संकल्पनेतून तब्बल ७ हजार ४९१ वारकरी भाविकांना मोफत आरोग्य सेवा पुरविली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सतीश कोपूरवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ भाऊसाहेब जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ विलास जाधव यांनी हा उपक्रम राबविला.
यंदाच्या वारीत प्रथमच पिलीव येथे जर्मन हॅगर मुख्यमंत्री वारकरी निवारा केंद्र उभारण्यात आल्यामुळे सातारा,सांगली जिल्ह्यातील शेकडो दिंड्यांना याचा लाभ झाला. ‘आरोग्यसंपन्न वारी’ या डिजिटल ॲपचा वापर करून आरोग्य सेवा अधिक जलद व तंत्रज्ञानाधारित करण्यात आल्या. सातारा पंढरपूर मार्गापासून सुळेवाडी ते तांदुळवाडी पर्यंत २ जर्मन हॅगर मुख्यमंत्री वारकरी निवारा केंद्र (जलावरोधक) व ५ बूथ मार्फत व्यापक आरोग्य यंत्रणा उभारण्यात आली होती.
यासाठी १ रुग्णवाहिका, १ वैद्यकीय अधिकारी , ३३ कर्मचारी आणि २ गट प्रवर्तक,४३ आशा स्वयंसेविका तैनात करण्यात आले होते . पिलीव येथे २४ तास आरोग्य सुविधा कार्यरत होती, दिंडी प्रमुखांना औषदेउपचार किट वाटप करण्यात आले,पाणी स्रोतांचे निर्जंतुकीकरण, डेंग्यू-मलेरिया प्रतिबंधात्मक उपाययोजना, स्वच्छता अभियान आणि आरोग्य जनजागृती यांसह विविध सेवा पुरविण्यात आल्या.
प्रभावी आरोग्य व्यवस्थेमुळे लाखो वारकऱ्यांना वेळेत उपचार मिळून वारी अधिक सुरक्षित आणि आरोग्यसंपन्न झाली. अशी माहिती आरोग्य सहायिका एस.पी. शेवाळे यांनी दिली. फोटो _ पिलीव येथे आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा देताना.