बार्शी – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी दर्जेदार आणि निःशुल्क मार्गदर्शन उपलब्ध व्हावे, या उद्देशाने श्री शिवाजी महाविद्यालय, बार्शी संचलित कर्मवीर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामार्फत विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत.
यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ.अब्दुल शेख यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सातत्य, शिस्त, वेळेचे प्रभावी नियोजन आणि आत्मविश्वास यांच्या आधारावर करण्याचे आवाहन केले. स्पर्धेच्या वाढत्या युगात गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन, नियमित सराव आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या बळावर निश्चित यश संपादन करता येते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कर्मवीर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामार्फत यूपीएससी, एमपीएससी, एसएससी, बँकिंग, पोलीस भरती आदी विविध स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना पूर्णतः निःशुल्क मार्गदर्शन दिले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक, व्यक्तिमत्त्व विकास आणि करिअर मार्गदर्शनपर विविध उपक्रम नियमितपणे राबविण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
या केंद्रामार्फत विद्यार्थ्यांसाठी तज्ज्ञांचे मोफत मार्गदर्शन, गेस्ट लेक्चर्स, सुसज्ज वाचन कक्ष, नियमित सराव परीक्षा, मुलाखत मार्गदर्शन तसेच शंका-निरसन सत्रांचे आयोजन करण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
मार्गदर्शन केंद्रामार्फत आतापर्यंत डॉ. राहुल पालके (सामान्य इंग्रजी व चालू घडामोडी), डॉ. एस. बी. शिंदे (अर्थशास्त्र), प्रा. किशोर गरड (मराठी), डॉ. उमेश बरचे (रसायनशास्त्र), डॉ. आर. आर. पाटील (भूगोल), प्रा. सुरज कावरे (व्यावहारिक इंग्रजी) तसेच प्रा. प्रताप पाटील (अर्थशास्त्र व चालू घडामोडी) यांनी विविध विषयांवर विद्यार्थ्यांना दर्जेदार मार्गदर्शन केले आहे.
Post Views: 10