माळशिरस – शहर व परिसरातील काही गावातील पोळा हा शेतकऱ्याचा सण बुधवार (दि २९ ) रोजी असून बैल व इतर जनावरे सजविण्यासाठी साहित्य खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु आहे.
तालुक्यात काही भाग वगळता पेरणी लायक पाऊस झाल्याने शेतकरी वर्ग समाधानी असून पेरणी नंतरही पाऊस झाल्याने सर्वच पेरणी केलेली पिके जोमात आहेत .परंतु विंधन विहिरी ,विहिरी यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली नाही .शेतकरी आपल्या शेतीच्या कामात मोलाच काम करणाऱ्या बैलाचा पोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करीत असतो आताच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात शेतीतील सर्वच कामे यंत्रांच्या सहाय्याने शेतकरी करू लागला आहे.त्यामुळे बैल जोपासण्याचे प्रमाण कमी झाले आहे.परंतु शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी वर्ग दुदाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात करीत आहे.हा शेतकरी वर्ग आपल्या या गाई ,म्हशी यांना सजवून पोळा साजरा करीत आहेत.त्यामुळे सजविण्याच साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु आहेत.गावातील व्यापाऱ्यासह इतरही व्यापाऱ्यांनी रस्त्याच्या कडेला या पोळ्यासाठी लागणाऱ्या साहित्याची दुकाने थाटली आहेत.तसेच मातीचे,शाडूचे,बैल सुद्धा व्यापाऱ्यांनी विक्रीसाठी आणले आहेत.
Post Views: 11