अक्कलकोट तालुक्यातील सात बंधाऱ्यांच्या बॅरेज रूपांतरण सर्वेक्षणास 95.49 लाखांची मंजुरी

अक्कलकोट  : अक्कलकोट तालुक्यातील जलसिंचन आणि भूजल संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल मानल्या जाणाऱ्या कोल्हापूर पद्धतीच्या सात बंधाऱ्यांचे बॅरेजमध्ये रूपांतरण करण्यासाठी आवश्यक सर्वेक्षण व अन्वेषणाच्या कामास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिफारशीने जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेल्या मंजुरीनुसार महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागांतर्गत महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे यांनी 95.49 लाख रुपयांची प्रशासकीय मंजुरी दिली आहे अशी माहिती आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली आहे.त्यामुळे या महत्त्वाकांक्षी योजनेच्या प्राथमिक प्रक्रियेला अधिकृतपणे सुरुवात झाली आहे.भीमा कालवा मंडळ, सोलापूर यांनी सन 2026-27 च्या आवश्यक कामांच्या प्रापणसूचीमध्ये या कामांचा समावेश करून मंजुरीसाठी प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार भीमा नदीवरील खानापूर, हिळळी तसेच सीना नदीवरील कोर्सगाव येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे बॅरेजमध्ये रूपांतरण करण्यासाठी सर्वेक्षण व अन्वेषणाच्या कामासाठी 40.49 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.तसेच बोरी नदीवरील अक्कलकोट, मिरजगी, संगोगी (बु.) आणि बबलाद येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांच्या बॅरेज रूपांतरणासाठी आवश्यक सर्वेक्षण व अन्वेषणाच्या कामासाठी 55 लाख रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे.या सर्वेक्षणामध्ये नदीपात्राची भौगोलिक व तांत्रिक पाहणी, पाणी साठवण क्षमता, भूगर्भीय अन्वेषण, आवश्यक संरचनात्मक आराखडा तसेच प्रकल्पाच्या व्यवहार्यतेचा अभ्यास करण्यात येणार आहे. या अहवालाच्या आधारे पुढील टप्प्यात बॅरेज उभारणीसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.बॅरेज उभारणीमुळे पावसाळ्यातील अतिरिक्त पाणी अधिक काळ नदीपात्रात साठवून ठेवणे शक्य होणार असून, परिसरातील भूजल पातळीत वाढ, विहिरी व बोअरवेलचे पुनर्भरण, सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता वाढ, पिण्याच्या पाण्याचा अधिक शाश्वत स्रोत आणि शेती उत्पादनक्षमतेत वाढ होण्यास मदत होईल. यामुळे अक्कलकोट तालुक्यातील अनेक गावांना दीर्घकालीन जलसुरक्षेचा लाभ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.जलसंपदा विभागाच्या या निर्णयामुळे भविष्यात संबंधित बंधाऱ्यांचे आधुनिकीकरण होऊन स्थानिक शेतकरी, ग्रामस्थ आणि पाणीटंचाईग्रस्त भागांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.तसेच याकामी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, पालकमंत्री जयकुमार गोरे यांचेही मोलाचे सहकार्य लाभल्याचे कल्याणशेट्टी यांनी स्पष्ट केले.
प्रतिक्रिया,
अक्कलकोट विधानसभा क्षेत्रातील सिंचन व्यवस्था आणखी बळकट बनवून शेतकरी बांधवाना आणि नागरिकांचा आर्थिक स्तर आणखी उंचावण्यासाठी कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे बॅरेजेस सर्वेक्षण कामास पाठपुरावा करून मंजुरी मिळाली आहे.येत्या काळात पुढील कामास सुद्धा पाठपुरावा करून सिंचन व्यवस्था सुधारण्यास प्राधान्य देण्यात येईल
सचिन कल्याणशेट्टी
आमदार अक्कलकोट
Next Post

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!