सांगोला – विद्यामंदिर प्रशाला व ज्यु.कॉलेज येथे गुरूपौर्णिमेचे औचित्य साधून शिक्षक गुरुजनांचा सत्कार संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरूवातीला आद्यगुरु महर्षी व्यास व संस्थेचे संस्थापक कै.बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सकाळ सत्र उन्मेश आटपाडीकर, दुपार सत्र वसंत गुळमिरे यांनी गुरुमहात्म्य विषद केले. याप्रसंगी प्राचार्य चारुदत्त जगताप, उपमुख्याध्यापक प्रदीप धुकटे, उपप्राचार्य शिवशंकर तटाळे, पर्यवेक्षक उत्तम सरगर, काकासो नरूटे, नरेंद्र होनराव, प्रा.धनाजी चव्हाण उपस्थित होते. प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांनी गुरु-शिष्याच्या नात्याला उजाळा देत संस्थेचे सचिव मल्लिकार्जुन घोंगडे यांचा सर्वप्रथम सन्मान केला. विद्यार्थ्यांनी गुलाबपुष्प देऊन आपल्या सर्व शिक्षक-गुरुजनांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चारुदत्त जगताप, प्रदीप धुकटे, सूत्रसंचालन प्रा.माधुरी पैलवान, चैतन्य कांबळे यांनी केले. आभार शिवशंकर तटाळे, काकासो नरूटे यांनी मानले.