पिलीव – माळशिरस तालुक्यातील सुळेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी समाधान रामचंद्र सुळे तर उपाध्यक्षपदी. लक्ष्मण विलास करे यांची एकमताने निवड करण्यात आली. तर सदस्यपदी – सौ. कार्तिका सुळे, जमुना बरकडे, माया बिडे, काजल माने, वनिता सुळे, शशिकला सुळे, श्री. शिवाजी सुळे, उमाजी बोडरे, रामचंद्र सोलंकर, पुंडलिक लोखंडे, प्रदीप सुळे यांच्या सर्वानुमते बिनविरोध निवडी करण्यात आल्या.
निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान शाळेचे मुख्याध्यापक श्री. शेटे सर व सर्व शिक्षक वृंद यांनी केला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक नागन्नाथ शेटे सर यांनी सर्वांचे अभिनंदन करून शाळेच्या प्रगतीसाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन नूतन पदाधिकाऱ्यांना केले. ही सर्व प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यात सर्व पालकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल शाळेच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले. फोटो _ सुळेवाडी येथील जिल्ह्य परिषद प्राथमिक शाळेच्या अध्यक्षपदी समाधान सुळे तर उपाध्यक्षपदी लक्ष्मण करे.
Post Views: 14