मोडनिंब – मोडनिंब (ता. माढा) येथील जिल्हा परिषद मुलींच्या शाळेतील शालेय व्यवस्थापन समितीने मोबाइल मुक्त, तंबाखूमुक्त शाळा करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. सोमवारी (२७ जुलै) शालेय व्यवस्थापन समितीच्या बैठकीत हा ठराव घेण्यात आला. यावेळी सदस्य किरण खडके, व बालाजी वाघमारे, यांनी सांगितले की शाळेमध्ये अथवा शाळेच्या आवारात तंबाखूजन्य पदार्थ शिक्षक, विद्यार्थी, अथवा त्यांच्या पालकांनी सेवन करु नये, वर्गामध्ये आल्यानंतर शिक्षकांनी मोबाइलचा वापर करू नये. असेही या ठरावामध्ये म्हटले आहे. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्व सदस्य, मुख्याध्यापिका व सर्व शिक्षक उपस्थित होते.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

















