पंढरपूर – श्री क्षेत्र पंढरपूर वारकरी संप्रदायाचे आदरणीय वै.दादा महाराज मनमाडकर यांच्या तेराव्या पुण्यस्मरणानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन मनमाडकर परिवाराच्या वतीने आरती मंडप प्रांगण येथे करण्यात आले होते. त्यामध्ये पहिल्या सत्रात ख्यातनाम राष्ट्रीय कीर्तनकार संदीप बुवा मांडके यांचे हरिकीर्तन आयोजित करण्यात आले होते.त्यावेळेस ते सांगत होते.सुरुवातीला भगवान मनमाडकर, शुभांगीताई मनमाडकर राधामाई, कृष्णामाई.संदीप बुवा मांडके,महादेव महाराज अडसूळ, माऊली खरात,वैभव केंगार, ज्ञानेश्वर दुधाणे यांच्या हस्ते विठुरायाच्या प्रतिमेच पूजन आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. संदीप बुवा मांडके यांनी पूर्व रंगांमध्ये आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया या संत तुकाराम महाराजांच्या अभंग रचनेवर पूर्वरंग अतिशय सुंदर सांगत संतांनी आपलं हित कशात आहे ते सांगत असताना नामाची गोडी लावून परमार्थिक जीवन जगत असताना आपला संसार ही तितकाच चांगला असला पाहिजे तर परमार्थिक आनंदही चांगला मिळतो. सध्याच्या कलियुगात लहान पणापासून आध्यात्मिक संस्कार होणे अतिशय महत्त्वाची असून वै.श्री दादा महाराज यांनी हजारो निराधार विद्यार्थी आपल्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिकून त्यांना शैक्षणिक ज्ञानाबरोबर अध्यात्मिक संस्काराची शिदोरी देत आपलं आयुष्य घालवले. समाजहितामध्येच पारमार्थिक आणि प्रापंचिक हित दडलेल असते.प्रपंच आणि परमार्थातही नेहमी जाग राहिलं पाहिजे आळस द्वेष बाजूला सारून सर्वांशी प्रेमाने वागून आयुष्याचा जीवनाचा आनंद घेतला पाहिजे. संत गाडगे महाराजांनी स्वच्छतेच्या संदेशा बरोबर मनातील असलेली द्वेषाची भावना स्वच्छ केली पाहिजे. त्याप्रमाणे माणसांमध्ये जगलं पाहिजे सांगत पूर्व रंग सांगितला आणि उत्तर रंगांमध्ये पंढरपूर मध्ये होऊन गेलेले वासुदेव पुराणिक यांची सुंदर भागवत कथा हंप्पी नगरीत आयोजन केल होत त्यावेळी विठूरायाच वर्णन सांगत असताना विठूरायाला हंप्पी येथे घेऊन आले.आणि संत एकनाथ महाराजांचे पणजोबा संत भानुदास महाराज यांनी कर्नाटक हंपी येथील राजा घेऊन गेलेल्या विठूरायाला परत पंढरी नगरी मध्ये आणून
संतांना दर्शन दिल्याची कथा अतिशय सुंदर सांगत अनेक सुंदर अभंग सुश्राव्य स्वरात गाऊन उत्तर रंगात अधिक रंग भरला.त्यांना तितकीच सुंदर साथसंगत पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे तबला माऊली खरात हार्मोनियम वैभव केंगार यांनी करत कीर्तन रंगवून भाविक भक्तांना मंत्रमुग्ध केले.त्यावेळी वै.दादा महाराज मनमाडकर यांचा शिष्य परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.त्यानंतर दुपारच्या दुसऱ्या सत्रात दादा महाराज मनमाडकर यांच्या शिष्य परिवाराचे स्नेह संमेलन प्रमुख पाहुणे सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी तानाजी घाडगे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले.त्यावेळी सर्वांनी आपल्या आठवणी सांगत दोन तास चाललेल्या स्नेहसंमेलनात सुखदुःखच्या गोष्टी सांगत आनंदात घालवले.यावेळी अनेक भक्त भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनमाडकर परिवार भगवान भाऊ मनमाडकर शुभांगीताई मनमाडकर धनंजय भैय्या मनमाडकर,तुकाराम यांनी अधिक परिश्रम घेत कार्यक्रम यशस्वी केला.
Post Views: 7