पंढरपूर – उजनी व वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधील सततच्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये सातत्याने वाढ होत आहे .धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी उजनी व वीर धरणातून विसर्ग सोडण्यात आला आहे. चंद्रभागा नदीपात्रातून सायंकाळी पाच वाजता एक लाख ५ हजार ९७९ क्यूसेक्सने पाण्याचा प्रवाह सुरू असून चंद्रभागा नदीने पाण्याची इशारा पातळी ओलांडली आहे. संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी नगरपालिका प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले
पंढरपूर शहरातील चंद्रभागा नदीकाठच्या भागातील नागरिकांनी सुरक्षेबाबत दक्षता घ्यावी. तसेच नगरपालिका प्रशासनामार्फत रायगड भवन, पंढरपूर येथे नागरिकांना राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. संभाव्य पूर परिस्थितीमुळे बाधित होणाऱ्या नागरिकांच्या जीवनावश्यक वस्तू नेण्यासाठी नगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत वाहनांची व्यवस्था करण्यात आली असून. स्थलांतरित करण्यात येणाऱ्या नागरिकांना श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती मार्फत मोफत भोजन व्यवस्था करण्यात आली असल्याचेही मुख्याधिकारी श्री रोकडे यांनी सांगितले.
चंद्रभागा नदीकाठच्या नागरिकांनी पूर परिस्थितीच्या वेळी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहनही नगराध्यक्ष प्रणिती भालके व उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे यांनी केले आहे.
Post Views: 4