अकलुज – साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती अकलुज नगरपरीषदेसह शहरातील विविध सामाजिक संघटना,राजकीय पक्षांनी विधायक उपक्रम राबवून साजरी केली.
अकलुज नगरपरिषदेच्यावतीने जुन्या बसस्थानकाच्या समोरील आण्णभाऊ साठे स्मारकातील आण्णाभाऊ यांच्या पुतळ्याला माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.जयंतीनिमित्ताने रक्तदान शिबिर व अल्पोपहार वाटपाचा शुभारंभ केला.यावेळी नगराध्यक्षा रेश्मा अडगळे,नगरसेवक क्रांतीसिंह माने पाटील यांच्यासह सर्व नगरसेवक, नगरसेविका,माजी सदस्य दिपक खंडागळे,उत्कर्ष शेटे, विशाल मोरे,राहुल जगताप,प्रा.अरुण खंडागळे, बहुसंख्येने उपस्थित होते.
माळशिरस तालुका भारतीय जनता पार्टी व लहुजी साम्राज्य अकलुज यांच्यावतीने आण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त ५०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य,१२० सफाई कर्मचारी महिला यांना पैठणी,१ हजार ८०० लाडक्या बहिणींना साडी,गोरगरीब १०० मुलीं च्या नांवाने बॅकेत ५ हजार रु.मुदत ठेव पत्राच्या वाटपा बरोबर १० पत्रकारांना आदर्श पत्रकार परस्कार माजी खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर व माजी आ.राम सातपुते यांच्या हस्ते देण्यात आले.यावेळी ज्योतीदेवी माने पाटील,राजलक्ष्मी माने पाटील,नगरसेवक महेश शिंदे, राहुल लोंढे,दिपाली वाघमोडे,जयश्री एकतपुरे, सचिन शिंदे,आप्पासाहेब देशमुख,बाजीराव काटकर, जि.प.सदस्य चंद्रकांत जाधव,अतुल सरतापे,महादेव कावळे,नगर सेवक महेश शिंदे,राहुल लोंढे,नवनाथ साठे,लहुजी साम्राज्य संघटनेचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटना व ठाकुर साम्राज्य संघटनेच्या जयंती कार्यक्रमात जनसेवेचे प्रदेशाध्यक्ष डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांनी आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करुन ५०० महिला भगिनींना साडी वाटपासह ३०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले.याप्रसंगी आण्णासाहेब शिंदे,विठ्ठल इंगळे,आण्णा कोळेकर, ठाकुर साम्राज्यचे हिरा खंडागळे,तुषार काटे,रघुनाथ साठे यांच्यासह जनसेवा संघटना व ठाकुर साम्राज्य संघटनेचे पदाधिकारी,कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.सदुभाऊ चौकात जनसेवा रिक्षा संघटनेच्यावतीने अल्पोपहार वाटप डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी रीक्शा संघटनेचे चंद्रकांत जाधव,समाधान आवरे व कार्यकर्ते उपस्थित होते.तर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अकलुज आगारात जयंतीनिमित्ताने आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला आगार व्यवस्थापक विकास पोफळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी त्यांचे सहकारी अधिकारी,चालक,वाहक,प्रवासी उपस्थित होते. महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे अध्यक्ष किरण साठे यांनी अण्णाभाऊ साठें यांना अभिवादन करुन माळीनगर येथील चौकाचे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नामकरण केले.यावेळी महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
सायंकाळी विविध सामाजिक संघटनांनी साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने आण्णाभाऊ यांच्या प्रतिमेची अकलुज शहरातुन सवाद्यात मिरवणुक काढली.
Post Views: 8