सोलापूर शहरातील नागरी उष्णता बेट (Urban Heat Island) आणि भूपयोगातील बदल यांचा परस्परसंबंध, त्याचे भौगोलिक वितरण तसेच भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) व रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाच्या साहाय्याने करण्यात आलेले विश्लेषण हा या संशोधनाचा मुख्य गाभा आहे. वाढते नागरीकरण, बदलते भूपयोग आणि त्यातून निर्माण होणाऱ्या तापमानातील वाढीचा पर्यावरणावर होणारा परिणाम यांचा अभ्यास करून शाश्वत नागरी नियोजनासाठी उपयुक्त निष्कर्ष या संशोधनातून मांडण्यात आले आहेत. सोलापूरसारख्या वेगाने विकसित होणाऱ्या शहरांच्या नियोजनासाठी हे संशोधन दिशादर्शक ठरणार असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
तहेसीन शेख-मुजावर यांनी आपले संशोधन सोलापूर सोशल असोसिएशनचे कला व वाणिज्य महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक प्रा. डॉ. दिपक नारायणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले. संशोधनाच्या विविध टप्प्यांवर प्रा. डॉ. सचिन राजगुरू, प्रा. डॉ. धायगुडे तसेच डॉ. चेतन हुलसुरे यांचेही वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.






















