बार्शी – येथील श्री वर्धमान जैन र्वजनिक तालुका वाचनालय येथे दि.१ऑगस्ट रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी व साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ‘लेखन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. प्रथमतः लोकमान्य टिळक व साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला मोत्याची माळ अर्पण करुन प्रतिमेचे पुजन श्री जैनाश्रमचे माजी अध्यक्ष अजित कुंकूलोळ व वाचनालयाचे अध्यक्ष किशोर श्रीश्रीमाळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वाचनालयाचे सर्व सभासद व वाचक वर्ग, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सभासदांनी अण्णाभाऊ साठे यांच्या पुस्तकांचे वाचन करुन लोकमान्य टिळक यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ग्रंथपाल सुरेश यादव यांनी केले.तर सहा ग्रंथपाल सौ शितल लुकडे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. क्लार्क विराज पतंगे यांनी परिश्रम घेतले.
Post Views: 11