सोलापूर : एस.ई.एस. पॉलिटेक्निक, सोलापूर येथे शैक्षणिक वर्ष २०२६–२७ मध्ये प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्ष डिप्लोमा अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी स्वागत व ओरिएंटेशन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावर संस्थेचे प्राचार्य प्रा. एम. सी. पाटील उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांचे संस्थेत मनःपूर्वक स्वागत करून महाविद्यालयाची शैक्षणिक परंपरा, उपलब्ध सुविधा, गुणवत्तापूर्ण शिक्षण, शिस्त, नियमित उपस्थिती आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबाबत मार्गदर्शन केले. अभियांत्रिकी शिक्षणातून उज्ज्वल करिअर घडविण्यासाठी विद्यार्थ्यांनी सातत्य, मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोन जोपासावा, असे आवाहन त्यांनी केले.
उपप्राचार्य तथा प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारी प्रा. व्ही. एन. कोंगारी यांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण व प्लेसमेंट विभागाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
व्ही. आर. पवार यांनी शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजनांची सविस्तर माहिती देत पात्र विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज करून या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी विजयकुमार उडता यांनी विद्यार्थ्यांना उत्तम वर्तन, चारित्र्य, शिस्त, संवादकौशल्य आणि सकारात्मक व्यक्तिमत्त्व विकासाचे महत्त्व उदाहरणांसह सांगितले.
सूत्रसंचालन प्रा. व्ही. एस. बिराजदार यांनी केले, तर प्रा. एस. पी. जन्नू यांनी आभार मानले.या कार्यक्रमास सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच प्रथम वर्ष डिप्लोमा अभियांत्रिकीचे नव्याने प्रवेशित विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 16