पिलीव – माळशिरस तालुक्यातील बचेरी येथील जयंत कुमार शिवदास पाटील यांच्या राहत्या घरासमोर उभ्या केलेल्या होंडा सिटी या गाडीत दहा ग्रॅम सोन्याचे गंठण किंमत पन्नास हजार रुपये तसेच चाळीस ग्रॅम वजनाचे चांदीचे पैजण, विस ग्रॅम वजनाची चांदीची जोडवी व दहा ग्रॅम चांदीचे बिचवे अंदाजे किंमत विस हजार रुपये असे एकुण सत्तर हजार रुपयांचे दागिने तिन मे रोजी चोरुन नेला होता .याबाबत एकोणीस जुन रोजी माळशिरस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.या चोरीबाबत पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सांगोला तालुक्यातील अकोला येथील वंदना साळुंखे ( वंदना पंडीत रसाळे) व सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील शंकर जगन्नाथ राक्षे या दोघांना पोलीसांनी ताब्यात घेतले असता .या दोघांनी चोरीची कबुली दिली त्यांच्या कडुन चोरीचा सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके ,यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल स्वरुप शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल मन्सूर नदाफ, पोलीस कॉन्स्टेबल जयश्री साळुंखे यांनी या तपासाबद्दल नागरिकांमधुन समाधान व्यक्त केले जात आहे. फोटो _ बचेरी येथील सोने चोरी प्रकरणातील आरोपीसह पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे, स्वरुप शिंदे व इतर अधिकारी
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...





















