मोहोळ – उद्धव बाळासाहेबठाकरे गटाच्या युवासेना सोलापूर उपजिल्हाप्रमुख पदी मोहोळ येथील विजय गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे. अत्यंत *सामान्य कुटुंबातून पुढे आलेले, प्रत्येक युवकांची अत्यंत विश्वासाचे आपुलकी चे नाते निर्माण करणारे प्रत्येक वर्षी वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबीर, उन्हाळ्यात ग्रामीण भागातील आलेल्या लोकांची तहान* भागावी म्हणून मोफत पाणपोई, दिवाळीत फराळाचे वाटप, असे विविध सामाजिक उपक्रम *राबवून समाज हिताचे काम करणारे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे* तसेच विजय गायकवाड यांच्या आक्रमक कार्यशैलीमुळे मोहोळ तालुका तसेच परिसरात ठाकरे गटाचे पक्षसंघटन अधिक मजबूत होईल, असा विश्वास पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने व्यक्त केला आहे. विजय गायकवाड हे मोहोळ *येथील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी जिल्हाप्रमुख दीपक गायकवाड यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात*. त्यांच्या निवडीबद्दल मोहोळमधील शिवसैनिक, पदाधिकारी आणि समर्थकांकडून स्वागत होत आहे.