पिलीव – माळशिरस तालुक्यातील पिलीव परीसरात शेतकरी सध्या ऊसा ऐवजी केळीच्या शेतीकडे वळला आहे.कारण या पिकापासुन शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा होत होता .गतवर्षी आखाती देशात सुरु असलेल्या युद्धामुळे खरेतर भारतातुन केळी त्या देशात निर्यात झालीच नाही .यामुळे खरेतर केळी उत्पादक शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला .युद्धजन्य परिस्थिती संपल्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा मोठ्या प्रमाणावर केळीची लागवड केली आहे .केळीची पिलीव भागात मोठ्या प्रमाणात नवीन लागवड झाली आहे .कारण शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्याची अपेक्षा आहे .पण गेल्या महीन्यात अगदी 35 रुपये प्रतिकिलो एवढा चांगला दर शेतकऱ्यांना मिळाला .यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.पण हा महीना संपताच केळीच्या दरात अचानकच जवळपास 15 रुपये प्रती किलोची घसरण झाली .यामुळे सध्या शेतकरीवर्गात प्रचंड नाराजी पसरली आहे. कारण मशागत करुन केळीची रोपे लावण्यापासून ते केळी विक्री पर्यंत एकरी दोन लाखापर्यंत खर्च येतो .सध्या हा दर जवळपास 20 रुपये किलोवर आला आहे .यामध्ये अजुन वाढ व्हावी अशी शेतकऱ्यांची भावना आहे . आता श्रावण महीना चार दिवसावर आला आहे.या महीन्यात लोक उपवास करतात यामुळे केळीला मोठी मागणी यामुळे दरवाढ होईल अशी अपेक्षा आहे .पिलीव परीसरातील शेतकरी ऊस शेती ऐवजी केळी लागवडीकडे वळले आहेत. चौकट _ आम्ही केळी लागवडीसाठी मोठा खर्च केला आहे .गेल्या महीन्यात चांगला दर होता पण या महीन्यात अचानकच दर कमी झाली यामुळे चिंता वाढली आहे.दरवाढ व्हावी अशी अपेक्षा आहे ._ विजय मदने ,केळी उत्पादक शेतकरी ,झिंजेवस्ती.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...























