सोलापूर – दैनिक तरुण भारतच्या ४२व्या वर्धापनदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस आणि सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी तरुण भारतच्या कार्यालयास सदिच्छा भेट देत वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी तरुण भारतचे मुख्य संपादक प्रशांत माने, वरिष्ठ उपसंपादक अविनाश गायकवाड, उपसंपादक यशवंत गुरव यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस आणि सीईओ कुशल जैन यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनी दै. तरुण भारतच्या पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाचे कौतुक केले. समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासोबतच प्रशासन आणि नागरिकांमध्ये संवादाचा दुवा म्हणून माध्यमांची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनीही तरुण भारतच्या कार्याला शुभेच्छा देत सामाजिक प्रश्न, विकासकामे आणि जनहिताच्या विषयांना सातत्याने व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या भूमिकेचे कौतुक केले.
Post Views: 28