सोलापूर – किरकोळ भांडणाचा राग मनात धरून एका मित्राने झोपेत असलेल्या आपल्या 35 वर्षीय तरुण मित्राचा डोक्यात हातोडीचे घाव घालून निर्दयपणे खून केला . ही खळबळ जनक घटना करमाळा तालुक्यातील झरे येथे आज बुधवारी पहाटे साडेबारा वाजेच्या सुमारास घडली .
महादेव मनोज कुमार (वय 35 रा. चिकनी सहरसा, बिहार. सध्या रा.झरे फाटा ता.करमाळा) असे मयताचे नाव आहे.
मयत आणि आरोपी हे बिहार राज्यातील राहणारे असून ते झरे येथील सिमेंट पाईप तयार करण्याच्या कंपनीत कामाला होते. आणि ते दोघे इतर मित्रांसोबत एकाच खोलीत राहत होते. मंगळवारी रात्री मयत महादेव व आरोपी भारत जयंत शर्मा याच्यात तक्रार झाली होती. त्यांचे भांडण मित्रानी सोडवले होते. त्यानंतर आरोपी भारत हा खोलीचा दरवाजा आतून बंद करून झोपला होता. इतर मित्र खोली बाहेर ताटकळत उभे होते. त्यामुळे त्यांना खोलीमध्ये झोपण्यासाठी महादेव कुमार याने भारत यास खिडकीतून दगड टाकून जागे केले होते.त्यानंतर दार उघडल्या नंतर महादेव कुमार हा इतर मित्रांसोबत नेहमीप्रमाणे खोलीत जाऊन झोपला होता.
तो झोपल्याचे पाहून भारत शर्मा याने त्याच्या डोक्यात हातोड्याने प्रहार केला. त्याच्या ओरडण्याच्या आवाजाने इतर मित्र जागे झाले. त्यावेळी भारतच्या हातात हातोडा होता तर महादेव हा रक्ताच्या थारोळ्यत पडला होता. तेव्हा मित्रांनी बेशुद्ध पडलेल्या महादेव याला करमाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊन येथील शासकीय रुग्णालयात पहाटे दाखल केले केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले .
मयत महादेव कुमार हा झरे येथील एका सिमेंट पाईप कंपनी कामाला होता. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, आई वडील आणि एक भाऊ असा परिवार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली . सायंकाळी साडेसात वाजता शवविच्छेदन नंतर महादेव चा मृतदेह रुग्णवाहिकेतून बिहारला रवाना करण्यात आला.
Post Views: 31