पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी देशातील विविध धार्मिक, सांस्कृतीक, सामाजीक, तिर्थस्थळांच्या सर्वांगीन विकासासाठी मोठे योगदान दिले आहे. मंदिरे, घाट, विहिरी, धर्मशाळा, रस्ते, अन्नक्षेत्रे तसेच यात्रेकरूसाठी सर्व आवश्यक त्या सुविधांची उभारणी करून त्यांनी समाज हिताची व्यापक संकल्पना प्रत्यक्षात आंमलात आणली आहे. सर्व नागरीकांना न्याय मिळावा, गरजूच्या अडचणी दूर व्हाव्यात आणि समाजातील प्रत्येक घटकाला सन्मानाने जगता यावे, यासाठी अहिल्यादेवी होळकर यांनी सातत्याने प्रयत्न केले असे मत महाराष्ट्राचे माजी जेष्ठ मंत्री, महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे संस्थापक, मार्गदर्शक मा. डॉ. अण्णासाहेब डांगे यांनी व्यक्त केले.
चौंडी, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २३१ व्या पुण्यतिथी निमित्त आयोजीत करण्यात आलेल्या अभिवादन समारंभात मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी प्रमुख अथिती म्हणून महाराष्ट्र विधान परिषेचे सभापती मा. प्रा. ना. राम शिंदे साहेब होते. प्रारंभी चौंडी गावातील मार्गावरून धार्मीक व सांप्रदायीक पध्दतीने अहिल्यादेवीच्या पालखीची मिरवणूक नगर प्रदक्षणा काढण्यात आली. प्रारंभी पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या पुतळ्याचे पूजन व दिप प्रज्वलनाने समारंभास सुरूवात झाली. पुण्यतिथी निमित्त दूपारी १२:०० वाजता अहिल्यादेवींच्या पुतळ्यावर मान्यवर व समाज बांधवांच्या उपस्थितीतीत पुष्प वृष्टी करण्यात आली. स्वागत व प्रास्थाविक महाराष्ट्र मल्हार सेनेचे सरसेनापती मा. श्री. बबनराव रानगे यांनी केले.
यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती मा. ना. श्री. राम शिंदे साहेब बोलताना म्हणाले कि, अहिल्यादेवीचे विचार भावी पिढीला मार्गदर्शकच आहेत. अहिल्यादेवीनी आपल्या कार्यातुन लोक कल्याण, न्याय, समाता, महिला सक्षमिकरण, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक बांधीलकी चा आदर्श सर्व समाजासमोर ठेवला आहे. त्यांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत राज्यकारभाराची धुरा समर्थपणे सांभाळली, प्रजेच्या सुख दुःखाची जाण ठेवणाऱ्या या लोकमातेने सार्वजनीक सुविधांच्या विकासासाठी उल्लेखनिय कार्य केले आहे.
महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती मा. ना. राम शिंदे साहेब यांचा सत्कार महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष मा. अँड. राजेंद्र ऊर्फ चिमणभाऊ डांगे यांच्या हस्ते करण्यात आला. अन्य मान्यवर यांचा सत्कार मा. श्री. विश्वनाथ डांगे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी आमदार मा. अँड. रामहरी रूपनवर, माजी प्रदेशाध्यक्ष मा. श्रीरामभाऊ पुंढे, अहिल्या महिला संघाच्या प्रदेशाध्यक्षा मा. डॉ. अलकाताई गोडे, सौ. पुष्पाताई घुलवाडे, प्रदेशाध्यक्ष मा. अँड. राजेंद्र ऊर्फ चिमणभाऊ डांगे यांनी मनोगते व्यक्त केली.
अभिवादन समारंभास महासंघाचे कोष्याध्यक्ष मा. श्री. पांडूरंग काकडे, कर्मचारी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रा. अंकुशराव निर्मळ, संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सह सचिव मा. श्री. विश्वनाथ डांगे, श्री. उमेशभाऊ घुरडे, पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख मा. सागरभाऊ मलगुंडे, देवेंद्र मदने, मा. श्री. आण्णासाहेब बाचकर, टी. आर. गारळे, शंकरराव वगरे, गोरख गावडे, अशोकराव देवकाते, शिवराया हांडे, छगनराव नांगरे, चौंडी गावचे सरपंच श्री. अविनाश शिंदे, माजी सरपंच पांडूरंग उबाळे, अभिमन्यु सोनवणे, उपसरपंच कल्याणराव शिंदे यांच्यासह महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचे प्रमुख पदाधिकारी व समाज बांधव, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
अभिवादन समारंभाचे सुत्रसंचालन बजरंग कदम यांनी केले, कार्यक्रमाचे संयोजन मा. श्री. राजेंद्र ऊर्फ चिमणभाऊ डांगे, श्री. विश्वनाथ डांगे, सागरभाऊ मलगुंडे, तालुकाध्यक्ष श्री. दत्तात्रय तांदळे, अँड. उमेश कोळेकर, महिला तालुकाध्याक्षा सौ. मंगलताई कणप, शहर महिलाध्यक्षा सौ. विद्याताई करे, अजित पाटील, प्रकाश कणप, गणपती वाटेगांवकर, भानुदास विरकर, राजेंद्र सिद, उमेश गावडे, मंगेश लवटे यांनी केले. शेवटी आभार नांदेड चे मा. श्री. पांडूरंग काकडे यांनी मानले.




















