बार्शी – नगरपालिका प्रभाग क्रमांक २० मधील नगरसेवक मुजम्मील पठाण यांच्या विरोधात माजी नगरसेवक ऍड महेश जगताप यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे अपात्रता अर्ज दाखल केलेला आहे त्याची सुनावणी दि. १४ ऑगस्ट रोजी ठेवलेली आहे
त्या पार्श्वभूमीवर नगरसेवक मुजम्मील पठाण यांचे भाऊ बार्शीतील काँग्रेस पदाधिकारी वसीम रमजान पठाण, नईम जहांगीर पठाण व हसन रमजान पठाण यांनी सामाजिक कार्यकर्ते लालू सौदागर यांना तू वकील महेश जगताप याला तिसऱ्या अपत्याची माहिती का दिली म्हणून दि. १३ ऑगस्ट रोजी जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. लालू सौदागर यांनी बार्शी शहर पोलीस स्टेशन येथे तक्रार केली असून यापूर्वीही पोलीस निरीक्षक गणेश कुंभार यांनी कुरेशी जमातीची पोलीस स्टेशनमध्ये मिटींग बोलावली होती तेंव्हा मिटींग संपल्यानंतर पोलीस स्टेशन आवारात पोलिसांसमोर नईम पठाण यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यावेळेस पोलीस निरीक्षक गणेश कुंभार यांनी नईम पठाण याला समज दिली होती तरी देखील ही घटना घडली असल्याने पोलिसांच्या कारवाई वर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
Post Views: 22