सांगोला – जिल्हा रुग्णालय सोलापूर, रोटरी क्लब ऑफ जुळे सोलापूर, आपुलकी प्रतिष्ठान व सांगोला महाविद्यालय, सांगोला यांचे संयुक्त विद्यमाने ‘जुगजुगजिओ’ पंधरवड्यानिमित्त ‘अवयवदान जीवनदान’ या विषयावर वकृत्व स्पर्धा सांगोला महाविद्यालयात आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत सृष्टी सुनिल लिगाडे प्रथम, सुमित सोमा होणमुखे द्वितीय, आकीब शकील तांबोळी तृतीय तर उत्तेजनार्थ क्रमांक सतीश रामचंद्र वाघमोडे याने मिळवला. यशस्वी विद्यार्थ्यांना प्र.प्राचार्य डॉ.सुरेश भोसले, आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव, सचिव संतोष महिमकर, सुरेश चौगुले, दादा खडतरे, निलकंठ लिंगे, अतुल वाघमोडे यांच्या हस्ते सहभाग प्रमाणपत्र, ट्रॉफी, रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेचे परीक्षण प्रा.डॉ.नवनाथ शिंदे, प्रा.प्रसाद लोखंडे, प्रा.निखिल जावीर यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.संतोष लोंढे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.सदाशिव देवकर, राष्ट्रीय गुणवत्ता हमीचे डॉ.आर.जी.पवार, डॉ.जमीर तांबोळी, प्रा.संजय बाबर, राहुल ढोले यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.विधीन कांबळे, सूत्रसंचालन प्रा.डॉ.शितल घोंगडे यांनी केले.
Post Views: 15