Saturday, August 15, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

श्रीमद् भागवत कथा म्हणजे श्रीकृष्णाचे वाङ्गमयीन शरीरंच

तरुण भारतbyतरुण भारत
August 15, 2026
in west maharashtra
0
श्रीमद् भागवत कथा म्हणजे श्रीकृष्णाचे वाङ्गमयीन शरीरंच
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
बार्शी – भगवान श्रीकृष्ण आपला अवतार संपवून श्रीमद् भागवत कथा या ग्रंथात प्रविष्ट झाल्याने हाच श्रीकृष्णाचे वांग्मयीन शरीर असून या पंचाला श्रीमद् भागवत कथामृत असेही म्हटले जात असल्याचे ह.भ.प. जयंत बोधले महाराजांनी प्रतिपादन केले आहे.
प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी श्रीभगवंत देवस्थान मंडळ, बोध
राज भक्त मंडळ आणि श्रीभगवंत देवस्थान पुजारी मंडळ
बडवे यांच्या संयुक्तविद्यमाने ग्रामदैवत श्रीभगवंत मंदिरात
महिनाभर घालणाऱ्या श्रावणमासीय प्रवचन मालेचा गुरुवार दि. १३ ऑगस्ट रोजी शुभारंभ करण्यात आला.
त्यावेळी प्रवचनकार ह.भ.प. जयवंत बोधले  महाराज बोलत होते. यंदाचे हे २४ वे वर्ष आहे. यापूर्वी प्रतिवर्षी वेगवेगळ्या विषयांवर महाराजांनी निरुपणे  केली आहेत. त्यामधे संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, संत एकनाथ, संत मुक्ताबाई, संत माणकोजी, हरिपाठ, श्रीकृष्ण चरित्र, विष्णु सहस्रनाम, चांगदेव पासष्टी, नारद भक्ती सूत्रे, असे विविध अध्यात्मिक विषय घेण्यात आले होते. या विषयांवर बोधले महाराजांनी सतत महिनाभर निरुपण केले आहे. यावर्षी श्रीमद् भागवत कथा चिंतन भाग दोन गतवर्षीच्या श्रीमद् भागवत कथा भाग एकवरुन पुढे उर्वरित निम्म्या भागावर रोज सायंकाळी ६ ते ७ या वेळेत निरुपण केले जाणार आहे. श्रीमद् भागवत कथेचे माहात्म्य सांगत असताना मागील वर्षीच्या कथेचा सारांश रुपाने परामर्ष, धावता आढावा घेत महाराज म्हणाले, मृत्यूपेक्षा मृत्यूची भीती माणसाला त्रास देत असते आणि ही भीती घालवण्याचे काम विशेषतः श्रीमद् भागवत कथा करते. शिवलीलामृत, गुरुचरित्र हे ग्रंथ उपासनेचे आहेत तर विचार सागर, ब्रह्मसूत्र हे अभ्यासाचे ग्रंथ आहेत. श्रीमद् भागवत कथा उपासना आणि अभ्यास असा संयुक्त ग्रंथ आहे. यामध्ये १२ स्कंध, १८००० श्लोक असून पारायण उपासना आणि तत्त्वज्ञानाचा अभ्यासही आहे. श्रोता कसा असावा तर कथा अथवा ग्रंथ ऐकणाऱ्या श्रोत्यांचा आपल्या गुरुवर विश्वास, दीनत्वाची भावना, मनोदोषावर जय आणि ऐकताना बुद्धी स्थिर असली पाहिजे. या ग्रंथामध्ये आपल्याला जीवनातील तत्वज्ञानाची उकल आणि मांडणी दिसून येते. याशिवाय प्रतिपाद्य विषय लक्षात येणे महत्त्वाचे असल्याने श्रोता तत्पर असला पाहिजे, सावधान असला पाहिजे, त्याची श्रद्धा असली पाहिजे. त्याच बरोबर इंद्रिय निग्रहही आवश्यक आहे. जगावं कसं यासाठी गीता वाचावी आणि मरावं कसं हे श्रीमद्भागवत कथेतून जाणून घ्यावे. प्रारब्ध हे भोगूनच संपवावे लागते. हा ग्रंथ कृतीत नव्हे तर वृत्तीत परिवर्तन घडविणारा आहे. श्रीमद् भागवत कथा म्हणजे भारतीय संस्कृतीचे दिग्दर्शनच आहे, शिवाय पारांचाचा मूळ विषयच मृत्यूची भीती घालविणे असल्याचे महाराजांनी शेवटी स्पष्ट केले. मुक्ती म्हणजे काय? मृत्यूसमयी मुक्तीचीइच्छा व्हावी काय? संपूर्ण सृष्टीची रचना कशी झाली? कोणी केली? अवतार म्हणजे काय? यावरही आपल्या विषय विस्तारात भाष्य केले.
प्रभावशाली व्यक्तिमत्व, विविध ग्रंथातील दाखले, दृष्टांत, उदाहरणांसह अस्खलित भाषेत सुस्पष्ट उच्चारांसह मनाचा ठाव घेणारे सुश्राव्य, अभ्यासपूर्ण विवेचन, विश्लेषण आणि सर्वात विशेष म्हणजे वक्तशीरपणा आदी कारणांमुळे प्रवचनास स्थानिक श्रोत्यांचा तर उदंड प्रतिसाद मिळतो शिवाय महाराजांना मानणारे त्यांचे दूरदूरचे अनुयायी, स्नेही अधूनमधून आवर्जुन उपस्थित राहात असतात. श्रीभगवंत मंदिर प्रवचनप्रेमी महिलापुरुष मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
Post Views: 15
Previous Post

अवयवदान जीवनदान’ वकृत्व स्पर्धेत सृष्टी लिगाडे प्रथम

Next Post

हिराचंद नेमचंद कॉलेजतर्फे ‘आझादी के रंग – युवा के संग’ पथनाट्य स्पर्धेचे यशस्वी आयोजन

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
हिराचंद नेमचंद कॉलेजतर्फे ‘आझादी के रंग – युवा के संग’ पथनाट्य स्पर्धेचे यशस्वी आयोजन

हिराचंद नेमचंद कॉलेजतर्फे ‘आझादी के रंग – युवा के संग’ पथनाट्य स्पर्धेचे यशस्वी आयोजन

ताज्या बातम्या

कै.वि.मो.मेहता प्राथमिक शाळेत नागपंचमीचा सण उत्साहात साजरा

कै.वि.मो.मेहता प्राथमिक शाळेत नागपंचमीचा सण उत्साहात साजरा

August 15, 2026
नागरी सहकारी बँकांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सीईओ, मुख्य व्यवस्थापक यांचेसाठी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

नागरी सहकारी बँकांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सीईओ, मुख्य व्यवस्थापक यांचेसाठी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

August 15, 2026
नागपंचमीनिमित्त वेळापूरात महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ; विविध स्पर्धांचे आयोजन

नागपंचमीनिमित्त वेळापूरात महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ; विविध स्पर्धांचे आयोजन

August 15, 2026

जुगार अड्ड्यावर धाड, सहा जणांवर कारवाई, 3 लाख 74 हजार  580 रुपयाचा मुद्देमाल जप्त

August 15, 2026

विरेगाव ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहाराच्या चौकशीची मागणी

August 15, 2026

बार्शीत प्रतिबंधित गुटखा-पानमसाल्यावर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; दोन पानटपऱ्यांवर छापे

August 15, 2026
योगिता चव्हाणचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

योगिता चव्हाणचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

August 15, 2026
व्यसनांपासून दूर राहा, करिअरवर लक्ष केंद्रित करा-डॉ.बसवराज शिवपूजे

व्यसनांपासून दूर राहा, करिअरवर लक्ष केंद्रित करा-डॉ.बसवराज शिवपूजे

August 15, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1066624

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!