सोलापूर : हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स (स्वायत्त), सोलापूरच्या व्यवस्थापन विभागातर्फे स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ‘Azadi Ke Rang – Yuva Ke Sang’ आंतरमहाविद्यालयीन पथनाट्य स्पर्धा २०२६ चे यशस्वी आयोजन करण्यात आले. चार हुतात्मा पुतळ्याजवळ, पार्क चौक, सोलापूर येथे झालेल्या या स्पर्धेत विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून पथनाट्याच्या माध्यमातून सामाजिक जनजागृतीचा प्रभावी संदेश दिला.
या स्पर्धेत दयानंद विधी महाविद्यालयाने प्रथम क्रमांक, संगमेश्वर महाविद्यालयाने द्वितीय क्रमांक तर सोनी महाविद्यालयाने तृतीय क्रमांक पटकावला.स्पर्धेसाठी ‘स्वातंत्र्याचा खरा अर्थ’, ‘पर्यावरण वाचवा, राष्ट्र वाचवा’, ‘महिला सक्षमीकरण’, ‘व्यसनमुक्त भारत’ आणि ‘स्वच्छ भारत, निरोगी भारत’ हे विषय देण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी प्रभावी अभिनय, संवादफेक व सादरीकरणाच्या माध्यमातून या विषयांवर भाष्य करत समाजामध्ये सकारात्मक परिवर्तनाचा संदेश दिला.कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख पाहुण्यांचे स्वागत प्राचार्य डॉ. सत्यजित शहा यांनी केले. आपल्या स्वागतपर मनोगतात त्यांनी हिराचंद नेमचंद कॉलेजतर्फे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक व विद्यार्थी-केंद्रित उपक्रमांची माहिती दिली. विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासापुरते मर्यादित न ठेवता त्यांच्या कलागुणांना, नेतृत्वगुणांना आणि सामाजिक जाणिवांना वाव देण्यासाठी महाविद्यालय सातत्याने विविध उपक्रम राबवत असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाची प्रस्तावना व्यवस्थापन विभागप्रमुख डॉ. पी. पी. कोठारी यांनी केली. यावेळी त्यांनी पथनाट्य स्पर्धा आयोजित करण्यामागील हेतू विशद करताना, युवकांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबरोबरच सामाजिक प्रश्नांवर जनजागृती निर्माण करणे आणि युवकांना सामाजिक परिवर्तनाचे दूत बनविणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिल्हा सरकारी वकील मा. श्री. प्रदीपसिंह राजपूत यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना, युवकांनी आपल्या कलागुणांचा उपयोग समाजजागृतीसाठी करावा आणि सामाजिक प्रश्नांबाबत संवेदनशील राहावे, असे आवाहन केले. तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. महादेव राऊत, फौजदार चावडी पोलीस स्टेशन, सोलापूर यांनी युवकांची सामाजिक परिवर्तनातील भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगत विद्यार्थ्यांच्या प्रभावी सादरीकरणाचे कौतुक केले.
स्पर्धेचे परीक्षण सौ. अश्विनी अमीर तडवळकर, प्रमुख, डिजिटल न्यूज विभाग, दैनिक तरुण भारत, सोलापूर यांनी केले. आशय, अभिनय, संवाद, विषयाची मांडणी, सादरीकरणाची प्रभावीता आणि सामाजिक संदेश या निकषांच्या आधारे स्पर्धेचे परीक्षण करण्यात आले.दयानंद विधी महाविद्यालयाने प्रथम क्रमांक, संगमेश्वर महाविद्यालयाने द्वितीय क्रमांक आणि सोनी महाविद्यालयाने तृतीय क्रमांक मिळविला. विजेत्या संघांचे मान्यवरांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. किरण गायकवाड, प्रा. मनाली म्हेत्रे व प्रा. भाग्यश्री गोरे तसेच MBA, BBA व BCAच्या विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. प्राचार्य डॉ. सत्यजित शहा व व्यवस्थापन विभागप्रमुख डॉ. पी. पी. कोठारी यांच्या मार्गदर्शन व सहकार्याने स्पर्धेचे नियोजन व आयोजन करण्यात आले.यावेळी BBA प्रमुख डॉ. रजनी शिरसागर, BCA प्रमुख प्रा. अनिता सद्दलगी, तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.युवकांच्या कलागुणांना व्यासपीठ देत सामाजिक प्रश्नांवर प्रभावी जनजागृती करणारी ‘आझादी के रंग – युवा के संग’ पथनाट्य स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाली.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...





















