सांगोला – फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च, सांगोला मध्ये भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी इस्टेट डायरेक्टर डॉ.संजय आदाटे, इंजिनिअरिंगच्या उपप्राचार्या डॉ.विद्याराणी क्षीरसागर, पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा.तानाजी बुरूंगले, फार्मसीचे प्राचार्य डॉ.संजय बैस, स्कूलचे प्राचार्य सिकंदर पाटील यांच्यासह फॅबटेक परिवारातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दरम्यान विद्यार्थ्यांनी देशप्रेमाने भारलेली भाषणे सादर केली. विद्यार्थ्यांच्या प्रभावी वक्तृत्वातून राष्ट्रप्रेम, स्वातंत्र्याचे महत्त्व आणि देशाप्रती असलेली जबाबदारी यांचा संदेश देण्यात आला. याशिवाय विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरणात देशभक्तीचा रंग भरला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनिषा यांनी केले. आभार रेश्मा तोडकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फॅबटेक टेक्निकल कॅम्पसमधील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
Post Views: 10