करकंब – १५ ऑगस्ट रोजी भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन संपूर्ण भारत देशामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.त्या अनुषंगाने करकंब ता.पंढरपूर येथील प्रतिक्षा शिंदे (समाजसेविका),अर्जुन शिंदे (वन निरीक्षक),वैभव शिंदे (पोलीस उपनिरीक्षक) व शिंदे परिवाराच्या वतीने स्वातंत्र्याचा उत्सव आणि विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवी दिशा देण्याच्या दृष्टीने जि.प.प्रा.शाळा शेटे वस्ती नं.१ करकंब येथील विद्यार्थ्यांना वह्या व शालेय दप्तर तसेच जि.प.प्रा.शाळा अलंकापुरी शाळेस नविन संगणक संच भेट देण्यात आला.विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत करणे हीच खरी राष्ट्रसेवा आहे.स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करताना विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी,छोटासा हातभार लावण्यासाठी,त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना देत आहोत.असे मनोगत यावेळी शिंदे परिवाराने व्यक्त केले.या शैक्षणिक मदतीबद्दल संबंधित शाळेतील मुख्याध्यापक,शिक्षक व विद्यार्थी वर्गाकडून शिंदे परिवाराचे आभार मानण्यात आले.
Post Views: 4