सोलापूर – प्रवाशांच्या मागणीनुसार, भारतीय रेल्वे सोलापूर विभागातील स्थानकांवरून धावणाऱ्या सोलापूर-अनकापल्ले साप्ताहिक विशेष गाड्यांचे नियमित रेल्वे सेवांमध्ये रूपांतर करणार आहे. या गाड्या आता नियमित रेल्वे क्रमांकांसह चालवल्या जातील, ज्यामुळे प्रवाशांना वर्षभर खात्रीशीर कनेक्टिव्हिटी आणि प्रवासाचे उत्तम नियोजन करणे शक्य होईल.
सध्याची विशेष गाडी ०१४७७ चे रूपांतर २१.०८.२०२६ पासून ‘सोलापूर-अनकापल्ले साप्ताहिक गाडी ११३१३’ या नियमित सेवेत केले जाईल. ही गाडी दर शुक्रवारी सोलापूरहून ०९:२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १४:४० वाजता अनकापल्ले येथे पोहोचेल. तर सध्याची विशेष गाडी क्र. ०१४७८ चे रूपांतर २२.०८.२०२६ पासून ‘अनकापल्ले-सोलापूर साप्ताहिक गाडी ११३१४’ या नियमित सेवेत केले जाईल. ही गाडी दर शनिवारी अनकापल्लेहून १७:३५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी २३:५० वाजता सोलापूर येथे पोहोचेल.
अक्कलकोट रोड, दुधनी, गाणगापूर रोड, कलबुर्गी, वाडी, यादगीर, कृष्णा, रायचूर, मंत्रालयम रोड, अडोनी, गुंतकल, अनंतपूर, धर्मवरम, कादिरी, मदनपल्ले रोड, पिलर, पाकाला, तिरुपती, रेनिगुंटा, श्री कालहस्ती, गुडूर, नेल्लोर, ओंगोल, चिराला, तेनाली, विजयवाडा, एलुरु, ताडेपल्लीगुडेम, निदादवोलू, राजमुंद्री, समलकोट, अन्नवरम आणि एलामंचिली असे थांबे असतील तर १ एसी-२ टियर (AC-II Tier), १ एसी-३ टियर (AC-III Tier), ११ स्लीपर क्लास, ५ जनरल सेकंड क्लास आणि २ लगेज-कम-ब्रेक व्हॅन्स. असे एकूण २० डब्यांची रचना असेल.






















