सोलापूर : प्रज्ञा निकेतन एज्युकेशन सोसायटी, पुणे संचलित नागेश करजगी ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर येथील अधिष्ठाता–ट्रेनिंग अँड प्लेसमेंट डॉ. रवींद्र रघुनाथ पाटील यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक, करिअर विकास आणि उद्योग–अकादमी समन्वयातील योगदानाची दखल घेत त्यांना 2026 मध्ये दोन प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ‘एक्सलेन्स इन करिअर डेव्हलपमेंट 2026’ या राज्यस्तरीय पुरस्कारासोबतच त्यांना ‘नॅशनल लॉरेट ट्रेनिंग ॲण्ड प्लेसमेंट ऑफिसर ॲवॉर्ड 2026’ या राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराने गौरविण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या करिअर विकास, कौशल्यविकास, रोजगारक्षमता वाढविणे, प्रभावी करिअर मार्गदर्शन आणि उद्योग–शैक्षणिक क्षेत्रातील समन्वय यासाठी डॉ. पाटील सातत्याने विविध उपक्रम राबवत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागामार्फत सॉफ्ट स्किल्स, ॲप्टिट्यूड, कम्युनिकेशन स्किल्स, तांत्रिक प्रशिक्षण, मॉक इंटरव्ह्यू, प्री-प्लेसमेंट वर्कशॉप्स, उद्योग संवाद, कॅम्पस भरती आणि उद्योगाभिमुख प्रशिक्षण यांसारखे विविध उपक्रम प्रभावीपणे राबविले जात आहेत.
राज्यस्तरीय ‘एक्सलेन्स इन करिअर डेव्हलपमेंट 2026’ पुरस्कार प्लस 91 मीडिया, पुणे यांच्यावतीने आयोजित पुणे एज्युकेशन कॉन्क्लेव्ह 2026 मध्ये डॉ. पाटील यांना ‘एक्सलेन्स इन करिअर डेव्हलपमेंट 2026’ या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण करिअर विकासासाठी तसेच त्यांना उद्योगाच्या बदलत्या गरजांनुसार तयार करण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल हा सन्मान देण्यात आला.
या परिषदेत प्रसिद्ध व्यवस्थापन तज्ज्ञ डॉ. पवन अग्रवाल यांनी मुंबई डबेवाला व्यवस्थापन पद्धती या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग कलकर यांच्यासह शिक्षण व उद्योग क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधण्याची संधी उपस्थितांना मिळाली.
राष्ट्रीय ‘नॅशनल लॉरेट ट्रेनिंग ॲण्ड प्लेसमेंट ऑफिसर ॲवॉर्ड 2026’ हे पुरसकार पाय मिडिया सोल्युशन्स यांच्यावतीने आयोजित एज्युकेशनल लिडरशीप कॉनक्लेव- सातवी एडिशन आणि ‘नॅशनल लॉरेट ट्रेनिंग ॲण्ड प्लेसमेंट ऑफिसर ॲवॉर्ड 2026’ या कार्यक्रमात 9 ऑगस्ट 2026 रोजी पुणे येथे डॉ. पाटील यांना ‘नॅशनल लॉरेट ट्रेनिंग ॲण्ड प्लेसमेंट ऑफिसर ॲवॉर्ड 2026’ प्रदान करण्यात आला.
प्रशिक्षण व प्लेसमेंट क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, उद्योग–अकादमी सहकार्य, विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासासाठी केलेले प्रयत्न आणि विद्यार्थ्यांना भविष्यातील रोजगाराच्या संधींसाठी सक्षम करण्यातील योगदान याबद्दल त्यांचा या राष्ट्रीय पुरस्काराने गौरव करण्यात आला.
डॉ. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना केवळ रोजगार मिळवून देण्यावर भर न देता त्यांच्यामध्ये तांत्रिक कौशल्ये, सॉफ्ट स्किल्स, व्यावसायिक दृष्टिकोन, संवादकौशल्ये आणि जीवनकौशल्ये विकसित करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. विविध नामांकित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना मिळालेल्या रोजगाराच्या संधींमुळे या उपक्रमांना उल्लेखनीय यश मिळाले आहे.
“हा सन्मान संपूर्ण ऑर्किड परिवाराचा”
या दोन्ही पुरस्कारांबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना डॉ. आर. आर. पाटील यांनी सांगितले, “हे दोन्ही पुरस्कार माझ्यासाठी केवळ वैयक्तिक सन्मान नसून संपूर्ण ऑर्किड परिवाराच्या सामूहिक प्रयत्नांची पावती आहेत. संस्थेचे व्यवस्थापन, प्राचार्य, दोन्ही उपप्राचार्य, प्राध्यापक, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट टीम, विद्यार्थी, माजी विद्यार्थी आणि उद्योग भागीदार यांच्या सहकार्यामुळेच हे यश शक्य झाले आहे. या सन्मानामुळे विद्यार्थ्यांच्या करिअर विकासासाठी आणखी प्रभावी आणि उद्योगाभिमुख उपक्रम राबविण्याची प्रेरणा मिळाली आहे.”
डॉ. आर. आर. पाटील यांना मिळालेल्या दोन प्रतिष्ठित पुरस्कारांबद्दल संस्थेचे व्यवस्थापन, प्राचार्य, दोन्ही उपप्राचार्य, विभागप्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी, माजी विद्यार्थी तसेच शिक्षण व उद्योग क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. सोलापूरच्या शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर झालेली दखल ही संस्थेसाठी अभिमानाची बाब ठरली आहे.













