सोलापूर – मध्य रेल्वेने दौंड-कलबुर्गी पॅसेंजरसाठी वाशिंबे स्थानकावर अतिरिक्त थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
यामध्ये गाडी क्र. ५१३०१ दौंड-कलबुर्गी पॅसेंजर दी. .०८.२०२६ पासून वाशिंबे येथे आगमन ०५:५४ वाजता तर प्रस्थान ०५:५५ वाजता होईल. गाडी क्र. ५१३०२ कलबुर्गी-दौंड पॅसेंजर दी.०८.२०२६ पासून वाशिंबे येथे आगमन २०:४६ वाजता तर प्रस्थान २०:४७ वाजता होईल. गाडी क्र. ५१३०३ दौंड-कलबुर्गी पॅसेंजर दी.०८.२०२६ पासून वाशिंबे येथे आगमन ०५:५४ वाजता तर प्रस्थान: ०५:५५ वाजता होईल. गाडी क्र. ५१३०४ कलबुर्गी-दौंड पॅसेंजर दी.०८.२०२६ पासून वाशिंबे येथे आगमन: ०१:०८ वाजता तर प्रस्थान: ०१:०९ वाजता होईल.
गाडीच्या रचनेत (डब्यांच्या संख्येत) आणि इतर थांब्यांमध्ये कोणताही बदल नाही.
सोलापूर विभागाकडून प्रवाशांना या नवीन थांबा सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.




















