मोहोळ – मोहोळ पंचायत समिती मधील सत्ताधारी आणि विरोधी गटातील राजकीय संघर्ष निधी वाटपावरून उफाळून आला असून *सर्वांना समान निधी देण्याची सूचना जिल्ह्याच्या पालकमंत्री महोदय यांनी केलेल्या असताना सुद्धा* केवळ भाजपला लीड देणाऱ्या गावांना सभापती व गट विकास अधिकारी यांनी टक्केवारी घेऊन निधी दिला*
*आणि चक्क पालकमंत्र्यांच्या सूचनेला हरताळ फासला असल्याच* गंभीर आरोप विरोधी गटाच्या सदस्यांनी करत सभात्याग केल्याची माहिती राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार )गटनेते बाळासाहेब गायकवाड यांनी दिली .
मोहोळ पंचायत समितीमध्ये भारतीय जनता पार्टीचे ७ सदस्य तर सर्व विरोधी पक्षाचे ५ सदस्य आहेत . प्रशासकीय काळामध्ये मागील चार वर्षापासून थकीत असलेल्या १५ व्या वित्त आयोगाचा ७ कोटी २९ लाख रुपयांचा निधी मोहोळ पंचायत समितीला देण्यात आला आहे याबाबत मोहोळ पंचायत समितीच्या सभागृहामध्ये ३१ ऑगस्ट रोजी दुपारी खास मासिक सभेचे आयोजन करण्यात आले होते . या सभेमध्ये १५ व्या वित्त आयोगातील ७ कोटी २९ लाख रुपयांच्या निधी वाटपाचा विषय चर्चेला आला. मात्र या निधी वाटपात भाजपला लीड देणाऱ्या गावांना जास्तीचा निधी देण्यात आल्याचे निदर्शनास आले. याबाबत या निधी वाटपात पारदर्शकता ठेवण्यात आल्याची दिसून येत नव्हते निधी वाटपासाठी नेमके कोणते निकष वापरण्यात आले कोणत्या गावांना किती निधी देण्यात आला त्यामागील निर्णया प्रक्रिया काय याचा खुलासा प्रशासनाने करावा
शासनाचा निधी हा सर्व गावांच्या विकासासाठी असतो परंतु या ठिकाणी राजकीय सोय पाहून निधीचे वाटप करण्यात आले आहे निधी वाटपात टक्केवारीचा गैरप्रकार झाल्याचा आरोप म्हणजेच समिती सदस्य बाळासाहेब गायकवाड यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला यामुळे पंचायत समितीमध्ये भाजप आणि विरोधक यांच्यामध्ये असणारा राजकीय संघर्ष चव्हाट्यावर आला आहे यावेळी पंचायत समितीचे सदस्य गणेश मुळे धनाजी माळी संगीता वसेकर हे उपस्थित होते यावेळी विरोधी सदस्यांनी या निधी वाटपाच बाबत सभापती असलम चौधरी व गटविकास अधिकारी विवेक जमदाडे यांना जाब विचारला परंतु त्यांना याबाबत व्यवस्थितपणे उत्तर देता आले नाही त्यामुळे पंचायत समितीच्या मासिक बैठकीमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आणि विरोधी पक्षाचे सदस्यांनी सभा त्याग केला असल्याचे बाळासाहेब गायकवाड यांनी सांगितले.
विरोधी पक्षाचे गटनेते बाळासाहेब गायकवाड यांनी आमच्यावर केलेल्या टक्केवारीच्या आरोपात कोणतेही तथ्य नाही. *विरोधी गटाच्या सदस्यांनी निधी वाटपाचा कोणताही अभ्यास न करता घाईघाईने सभात्याग केला आहे. या सदस्यांनी चर्चेत सहभागी व्हायला हवे होते असा खुलासा मोहोळचे सभापती अस्लम चौधरी यांनी केला आहे*.
Post Views: 8