अक्कलकोट – वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एकूण 15 रिक्षा दक्षिण पोलीस ठाण्यात आणण्यात आल्या होत्या. त्यापैकी 10 रिक्षाचालकांविरुद्ध बी एन एस कलम 281 अन्वये कारवाई करण्यात आली आहे . उर्वरित रिक्षाचालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली. अक्कलकोट दक्षिण पोलिसांकडून रिक्षा,जीप व पिकअप चालकांची बैठक घेण्यात आली .; वाहतूक नियमांचे पालन, प्रवाशी व भाविकांशी सौजन्यपूर्ण वर्तनाच्या सूचना अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे चे पोलीस निरिक्षक विनोद घुगे यांनी दिल्या . वाहतूक शिस्त व प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे येथे रिक्षा,जीप व पिकअप चालकांची बैठक घेण्यात आली.
बैठकीदरम्यान रिक्षा,जीप व पिकअप चालकांना वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन करणे, प्रवाशांकडून विहित दरापेक्षा जास्त भाडे आकारू नये, रिक्षावर वाहन क्रमांक विहित नमुन्यात लावणे, आवश्यक कागदपत्रे जवळ बाळगणे व ती वैध ठेवणे तसेच रिक्षा विहित पार्किंगच्या ठिकाणीच पार्क करणे, अशा सूचना देण्यात आल्या.
प्रवासी घेण्यासाठी रस्त्याच्या कडेला एकावेळी एकच रिक्षा उभी राहील, वाहतुकीस अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच अक्कलकोट येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांशी सौजन्यपूर्ण वागणूक ठेवावी, विनाकारण हुज्जत घालू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले.
चौकट
नियमाचे उल्लंघन करणाऱ्यावर कायदेशिर होणार कारवाई
प्रवाशांकडून पैसे, सोन्या-नाण्यांसह कोणतीही मौल्यवान वस्तू बेकायदेशीररीत्या घेतल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित रिक्षाचालकाविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. तसेच सर्व रिक्षाचालकांनी आपल्या रिक्षांचा वैध विमा काढणे आवश्यक असून, 15 दिवसांच्या आत विहित गणवेश तयार करून घ्यावा, अशा सूचना देण्यात आल्या. सदर वेळी 40 ते 45 रिक्षा,जीप व पिकअप चालक उपस्थित होते.वाहतूक शिस्त, प्रवाशांशी सौजन्यपूर्ण वर्तन आणि अक्कलकोट येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुरक्षित व चांगली सेवा देण्याबाबत सुचना देण्यात आल्या असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
Post Views: 6