सांगली : सांगली अर्बन को-ऑप. बँक लि., सांगलीचे विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. उल्हास वि. नायक हे गेली ११ वर्षापासून या पदावर कार्यरत आहेत. त्यांची मुदत माहे नोव्हेंबर २०२६ अखेर आहे. रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकाप्रमाणे बँकींग रेग्युलेशन ॲक्ट व रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया परिपत्रकास अनुसरुन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नेमणूकीसाठी रिझर्व्ह बँकेची मान्यता असणे आवश्यक आहे. याकरीता रिझर्व्ह बँकेने CEO या पदासाठी “Fit & Proper Criteria ” हे निकष लागू केले आहेत. या निकषाप्रमाणे पात्र असलेस तसेच बँकेकडील व बँकेचा Performance पाहून रिझर्व्ह बँक याबाबत निर्णय घेत असते. श्री. नायक यांची यापूर्वी माहे नोव्हेंबर २०२६ अखेर ५ वर्षासाठी पुर्ननेमणूक केली होती. ती मुदत संपत असल्याने बँकेने त्यांच्या पुर्ननेमणूकीचा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेस पाठविला होता. त्यास रिझर्व्ह बँकेने दिनांक १४/०८/२०२६ रोजीच्या पत्रान्वये माहे नोव्हेंबर २०३० अखेर पुर्ननेमणूकीस मान्यता दिली आहे.
बी.आर. ॲक्ट मधील नवीन तरतूदीप्रमाणे १० वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेले संचालक अपात्र होणार आहेत. त्यामुळे बँकेच्या धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत आणि व्यवसायवाढीच्या वेगात सातत्य राखण्यासाठी श्री. नायक यांची पुर्ननेमणूक महत्वाची ठरणार आहे.
रिझर्व्ह बँकेने श्री. नायक यांच्या पुर्ननेमणूकीसाठी दिलेली मंजूरी केवळ एका व्यक्तीचा सन्मान नसून बँकेने मा. गणेशराव गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली संपुर्ण संचालक मंडळाने राबविलेले धोरण व गेले ११ वर्षात केलेली यशस्वी वाटचाल तसेच वित्तीय शिस्तीला मिळालेली एक प्रकारची पोहोच पावती आहे. परिवर्तन पॅनेल सत्तेवर आलेनंतर संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली श्री. नायक यांनी बँकेच्या सर्वांगीण विकासासाठी मोलाचे योगदान दिले आहे. बँकेचे आर्थिक वर्ष मार्च २०२६ अखेर रु. २३०० कोटीहून अधिक व्यवसाय असलेल्या या बँकेस व्यवसायाचे नवनवीन टप्पे पार पाडणे अधिक सुलभ होणार आहे.
श्री. नायक यांना बँकींग मधील असलेल्या ४० वर्षाच्या प्रदिर्घ अनुभवामुळे आणि संचालक मंडळ व कर्मचारी वर्गाच्या समन्वयातून बँकेने जुना संचित तोटा पुर्णपणे निरंक करुन ऑडिटचा ‘अ वर्ग’ दर्जा प्राप्त केला. तसेच बँकेने सभासदांना लाभांशही वितरित केला आहे. रिझर्व्ह बँकेच्या या मान्यतेमुळे बँकेच्या धोरणात्मक वाटचालीला स्थैर्य मिळाले असून येत्या काळात बँकेची प्रगती अधिक गतीने होईल.
श्री. नायक यांची सांगली जिल्हा सहकारी नागरी बँक्स असोसिएशन लि., सांगलीच्या नव्याने निवडून आलेल्या संचालक मंडळात तज्ञ संचालक म्हणून नुकतीच निवड झाली आहे. असोसिएशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील २० नागरी सहकारी बँकांना त्यांचे मार्गदर्शन मिळत
आहे.
त्यांच्या या मुदत वाढीस मान्यता मिळाल्यावर बँकेच्या नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मा. अध्यक्ष सीए. श्रीपाद खिरे यांचे हस्ते त्यांचा सत्कार करणेत आला.
बँकेचे सभासद, ग्राहक, कर्मचारी वर्ग यांचेकडूनही श्री. नायक यांचे अभिनंदन, कौतुक होत आहे.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...





















