पिलीव – माळशिरस तालुक्यातील मळोली येथे पिलीव एस्केपमधुन तब्बल चौदा वर्षांनंतर माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे भरुन घेतलेल्या बंधाऱ्यातील पाण्याचे जलपुजन आज त्याच्या हस्ते अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.पिलीव येथील असणारा मुख्य एस्केप नंबर 11 साखळी क्रमांक 138/650 मधुन सोडण्यात येणारे पाणी जवळपास चौदा वर्षांपासून बंद होता .या एस्केपमधुन पाणी झिंजेवस्ती, कुसमोड, मळोली ,शेंडेचिच या चार गावातील नागरिकांची पिण्याच्या पाण्याचा तसेच शेतीच्या पाण्यासाठी उपयोग होतो .माञ एस्केप बंद असल्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली होती .सध्या तर भिषण दुष्काळी परिस्थिती आहे .या परिस्थितीत चार गावातील शेती अडचणीत आले होते .याबाबत पिलीव जिल्ह्य परिषद गटाचे सदस्य चंद्रकांत जाधव यांनी याबाबत माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्याकडे कैफियत मांडली. आमदारांनी याबाबत जाहीर सभेत शब्द दिला होता .याबाबत त्यांनी थेट मंञालयात संबंधित खात्याचे मंञी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमवेत बैठक घेऊन ज्या काही याबाबत च्या अडचणी होत्या त्या संपवून कायदेशीर मार्गाने याला मंजुरी मिळविली .यासाठी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंञी जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रयत्न केले .अखेर 24 ऑगस्ट रोजी या एस्केपमधुन पाणी सोडण्यात आले यामुळे पिलीव ते शेंडेचिच पर्यंतचे 8 ते 9 बंधारे या पाण्याने भरुन घेतले .यामुळे चार गावातील शेतकऱ्यांचा आनंद द्विगुणित झाला .यानिमित्त मळोली येथील ओढयावरील पाण्याचे माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या उपस्थितीत जलपुजन करण्यात आले .यावेळी पिलीव जिल्ह्य परिषद गटाचे सदस्य चंद्रकांत जाधव, माजी जिल्ह्य परिषद सदस्य गणेश पाटील, माळशिरस तालुका मंडल अध्यक्ष नितीन मोहीते ,उपाध्यक्ष शशांक जाधव, पंचायत समिती सदस्य शिवराज पुकळे, पिलीव भाजपचे शहराध्यक्ष प्रमोद भैस, प्रभाकर आवताडे, रोहीत आवताडे, काळमवाडीचे बंडु जाधव, अमर भैय्या देशमुख, मदन देशमुख, पिनु येडगे, महेश काळे, माजी सरपंच तुषार लवटे, महादेव काळेल, रामभाऊ गोरड, अंकुश भैस यांच्यासह पिलीव, झिंजेवस्ती कुसमोड, मळोली ,शेंडेचिच भागातील शेतकरी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.यावेळी या एस्केपमधुन पाणी सोडल्याबद्दल चार गावातील शेतकऱ्यांच्या वतीने माजी आमदार रामभाऊ सातपुते व जिल्ह्य परिषद सदस्य चंद्रकांत जाधव यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला .तसेच तसेच मळोली येथील प्रमोद जगताप यांची डिवाय एसपी पदी नियुक्ती झाल्याबद्दल तसेच बारामती झटकाचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांना राज्यस्तरीय छत्रपती शाहू महाराज पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला. फोटो – मळोली येथे पाण्याचे जलपुजन करताना माजी आमदार रामभाऊ सातपुते, जि प सदस्य चंद्रकांत जाधव, माजी जिल्ह्य परिषद सदस्य गणेश पाटील, पंचायत समिती सदस्य शिवराज पुकळे, माळशिरस मंडल अध्यक्ष नितीन मोहीते व इतर मान्यवर.