सोलापूर : सोलापूर शहरातील मिळकतदारांना मिळकतकर भरण्यासाठी आणखी मुदतवाढ देण्यात आली असून, आता २० सप्टेंबर २०२६ पर्यंत कर भरता येणार आहे. संपूर्ण थकबाकीसह चालू आर्थिक वर्षाचा मिळकतकर एकरकमी भरल्यास ऑनलाईन भरणाऱ्यांना मनपा करामध्ये ६ टक्के, तर रोख अथवा धनादेशाद्वारे भरणाऱ्यांना ५ टक्के सवलत मिळणार आहे, अशी माहिती मालमत्ता कर विभागाच्या उपायुक्त सोनाली यादव यांनी दिली.
महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी मिळकतदार, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या मागणीचा विचार करून हा निर्णय घेतला आहे. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षातील मालमत्ता कराची देयके ६ एप्रिल २०२६ रोजी महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तसेच मिळकतदारांना एसएमएसद्वारे देयकाची लिंकही पाठविण्यात आली आहे. मात्र, सध्या शासनाकडून मतदार विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) कार्यक्रमाचे काम सुरू असल्याने छापील देयकांचे सर्व मिळकतदारांना वितरण करणे शक्य झालेले नाही. यापूर्वी मिळकतकर भरण्याची मुदत ३० जूनपर्यंत होती. त्यानंतर ती ३१ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली होती. तरीही अनेक मिळकतदारांसह पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी करावरील सवलतीची मुदत वाढविण्याची मागणी केली होती. त्यानुसार आता २० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
छापील देयकांचे वाटप काही प्रमाणात करण्यात आलेले आहे. सध्या शासनाकडून मतदार विशेष सखोल पुर्नरिक्षण कार्यक्रमाचे (SIR) कामकाज सुरु असल्याने छापील देयके सर्वाना वाटप करणे शक्य झालेले नाही. तथापी छापील देयकांची छपाई करण्यास काही कालावधी लागणार असल्याने, सर्व मिळकतदारांना आवाहन करण्यात येत मिळकत या कि, महानगरपालिका भरण्यासाठी कर संकेतस्थळावर ऑनलाईन सेवा
https://snictaxcalc.solapurcorporation.org/counter_receipt_online.aspx यामध्ये “मिळकत कर भरणे” हा पर्याय निवडून मिळकत भरता येईल. तसेच मिळकत कर भरण्याकरीता फोन पे, गुगल पे अशा सर्व प्रकारच्या पेमेंट गेटवेची सुविधा कार्यान्वित करण्यात आलेली आहे.
मिळकतदारांनी छापील देयक मिळाले किंवा नाही, तरीही महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर ‘मिळकत कर भरणे’ या पर्यायाद्वारे कर भरावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच फोनपे, गुगल पे आदी विविध पेमेंट गेटवेद्वारेही ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.
२० सप्टेंबरपूर्वी मागील संपूर्ण थकबाकीसह चालू आर्थिक वर्षाचा मिळकतकर एकरकमी भरल्यास ऑनलाईन भरणाऱ्यांना मनपा करामध्ये ६ टक्के, तर रोख अथवा धनादेशाद्वारे भरणाऱ्यांना ५ टक्के सवलत मिळणार आहे, अशी माहिती मालमत्ता कर विभागाच्या उपायुक्त सोनाली यादव यांनी दिली.
—-
Post Views: 50