मोहोळ – कर्जदार मोठे होत गेले.आणि त्या कर्जदारांनी कर्ज वेळेत परतफेड केल्यामुळे एनपीए शून्यावर येऊन सर्वांची प्रगती झाली. संस्थेची अशीच प्रगती व्हावीआणि लोकमंगल चे नांव महाराष्ट्रभर व्हावे अशी अपेक्षा मोहोळ मधील नामांकित मधुमेह आणि रक्ताचे विशेष विकार तज्ञ डॉ. जयंत गोळवलकर यांनी केले.
लोकमंगल पतसंस्थेच्या मोहोळ शाखेचे स्व-मालकीच्या जागेत स्थलांतर सोमवारी दि.७ सप्टेंबर२०२६ रोजी झाले.यावेळी उद्घाटक म्हणून डॉ. गोळवलकर बोलत होते. डॉ. जयंत गोळवलकर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे चेअरमन गुरण्णा काका तेली हे होते. व्यासपाठीवर पतसंस्थेचे संचालक युवराज नाना गायकवाड,डॉ. प्रमोद पाटील, डॉ. डी.पी. कदम (कुरुल),पतसंस्थेच्या व्हाईस चेअरमन सौ. निर्मला कुंभार, जेष्ठ समाजसेवक पद्माकर आप्पा देशमुख, भाजपाचे उत्तर मंडल अध्यक्ष आणि मोहोळचे नगरसेवक सतीश काळे, जनार्दन कोळेकर (गुरुजी),आदि मान्यवर उपस्थित होते .
यावेळी पतसंस्थेचे मुख्य संचालक युवराज (नाना ) गायकवाड यांनी संस्थेच्या स्थापनेची माहिती दिली. बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे, योग्य लोकांच्या उद्योगाला मदत व्हावी आणि आयुष्य स्थिर चालावे यासाठी आ. सुभाषबापूंनी ही पतसंस्था स्थापन केली. त्याचा आज वटवृक्ष झाला .असे सांगितले.
डॉ. प्रमोद पाटील, जनार्दन कोळेकर गुरुजी, यांनी मनोगत व्यक्त करताना लोकमंगल च्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपचे जिल्हा चिटणीस आणि एसआय आर विधानसभा प्रमुख महेश सोवनी, शिवसेनेचे ओबीसी विभागाचे राज्य प्रमुख आणि मोहोळचे नगरसेवक रमेश बारसकर, दत्तात्रय काकडे, भाजपाचे अनुसूचित जातीचे प्रमुख नेते छगन आष्टूळ, पत्रकार संजय आठवले महेश माने,बाबुराव ढाणके,इसाक हरणमारे,आदिंसह खातेदार, सभासद, ठेवीदार मोठ्या संखेने उपस्थित होते . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाखाधिकारी संतोष कदम अक्षय आनंदकर अविनाश कोकरे नयन काकडे महादेव जाधव अनिता टिंगरे प्रियंका देशमुख वर्षा गायकवाड वर्षा पाटील स्वप्निल आंबरे,वैभव शिवपुजे यांनी परिश्रम घेतले
Post Views: 15