पंढरपूर – वादग्रस्त आणि विध्वंसक पंढरपूर कॉरिडोरसाठी भूमी संपादन बाबत पंढरपूर नगर परिषदेच्या सभेमध्ये विषय घेण्यात आला आहे. त्याला विरोध करण्यासाठी बुधवारी (ता.९) मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती तिर्थक्षेत्र बचाव समितीचे अध्यक्ष अभयसिंह कुलकर्णी (इचगावकर) यांनी दिली.
या मोर्चा संदर्भात माहिती देताना अभयसिंह कुलकर्णी यांनी सांगितले की, आजपर्यंत भूसंपादन न करता शासकीय पडाक जागांवर कोरिडोर करावा अशी मागणी बचाव समितीची होती. परंतु विश्वासात घेऊन प्रकल्प राबविणार असे म्हणत सरकार आपला अजेंडा पुढे रेटत आहे. तसेच काही मोजक्याच लोकांचा कॉरिडॉरला विरोध आहे असे भासवत आहे. प्रत्यक्षात बहुसंख्य बाधितांचा कोरिडोरला विरोध आहे हे सिध्द झाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा हा विरोध जाणून घेतला आहे. तरीही प्रशासन घाई गडबड करीत आहे.
महाराष्ट्र नगर रचना कायद्याचे प्रक्रियेची पूर्ण पायमल्ली करून कॉरिडॉर पुढे रेटला जात आहे. त्यातीलच एक भाग म्हणजे नगरपरिषदेच्या सभेत भूमी संपादनाचा ठराव घेण्यात येणार आहे. याला तीव्र विरोध म्हणून पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीच्या वतीने नगरपालिकेवर मोर्चा काढण्यात येणार आहे बुधवार दिनांक ९ सप्टेंबर २०२६ या दिवशी सकाळी नऊ वाजता श्री संत नामदेव पायरी विठ्ठल मंदिर येथे वंदन करून कोरिर्डर बाधित भागातून महाद्वार चौक ते चौफाळा या रस्त्याने हा मोर्चा नगरपालिकेवर जाणार आहे. मोर्चा मध्ये सहभागी झालेली सर्व बाधित मंडळी नगरपालिकेच्या सभेला जाणाऱ्या सर्व नगरसेवक व नगराध्यक्ष यांना विनंती करण्यात येणार आहे.
तरी या मोर्चा बाधितांनी व पंढरपूर संस्कृती रक्षक नागरिकांनी अवश्य उपस्थित रहावे असे आवाहन तीर्थक्षेत्र बचाव समितीचे अध्यक्ष अभयसिंह इचगांवकर कुलकर्णी, उपाध्यक्ष माऊली महाराज गुरव, तसेच सर्व ज्येष्ठ सदस्य वारकरी संत,भाविक व कार्यकर्ते, यांचे वतीने करण्यात येत आहे.
Post Views: 12