अकलूज – गणेशोत्सव हरतालिकेचा उपवास यामुळे बाजारपेठेत मोठी गर्दी दिसून आली अकलूज मधील विजय चौकात आज गणेश मूर्ती तसेच सजावटीच्या साहित्याने अनेक दुकाने थाटलेली दिसत आहेत आज सकाळपासूनच ग्राहकांची गर्दी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर दिसत आहे गणपती बरोबरच हरतालिकेचाही उपवास उद्याच असल्याने उपवासाचे साहित्य त्यासाठी लागणारे पूजा साहित्य याचीही भाजी मंडई मध्ये विक्रेते आले आहेत अकलूज मध्ये विजय चौकाबरोबरच मारुती मंदिर गांधी चौक यशवंत नगर संग्राम नगर येथेही गणेशाच्या मूर्ती मोठ्या प्रमाणावर विक्रीस आले आहेत
आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थिती, डिझेलच्या वाढत्या किमती, पाणीटंचाई, कामगार पगार आणि पीओपीची दरवाढ याचा गणेशोत्सवातील उत्साहावर परिणाम जाणवण्याची शक्यता आहे. त्यात प्रमुख्याने मूर्तिकारांचा उत्पादन खर्च वाढला वाढल्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवासमोर महागाईचे संकट उभे राहण्याची भीती आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा गणेश मूर्ती बनवण्याची मागणीही कमी आहे.
गणेशोत्सव यावर्षी सप्टेंबर महिन्यात आला असून गणेश भक्त दरवर्षी प्रमाणे बाप्पांचे स्वागत करण्याची तयारी करणार आहेत. परंतु, आखाती देशांतील युद्धामुळे इंधन दरवाढीचा फटका मूर्तीकारांना बसला आहे. याच पार्श्वभूमीवर गतवर्षीच्या तुलनेत मूर्ती कमी संख्येने बनवण्याचा निर्णय साताऱ्यातील कुंभारवाड्यातील मूर्तीकारांनी घेतला आहे. मूर्ती
बनवण्यासाठी लागणाऱ्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या किंमतीत वाढ झाली आहे. याचबरोबर मजुरी आणि इंधन दरवाढीमुळे खर्चात वाढ होउन यांचा फटका मूर्तीच्या किमतींना बसणार आहे.
मूर्ती बनवण्यासाठी लागणारी माती दुसऱ्या राज्यातून आणण्यात येते. गतवर्षी या पीओपीचे भाव १५० रुपयांमध्ये २५ किलो म्हणजेच ६ रुपये किलो.सद्यस्थितीत हेच भाव २५० ते ३०० रुपयांनी वाढत आहेत.
म्हणजेच यामध्ये जवळपास दोन रुपये किलो तसेच बँगवर १०० रुपयाची वाढ झाली आहे. मूर्तीना देण्यात येत असलेल्या रंगाच्या भावामध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून आधी २१०० रुपयांमध्ये मिळणार रंगाची किंमत ३१०० रुपये झाली. पीओपीच्या मूर्ती बनवण्यासाठी साच्यांचा वापर केला जातो. हे साचे सर्वच मूर्तिकार विकत घेऊ शकत नाहीत. हे साचे भाडेतत्वावरही उपलब्ध होतात. अनेक मूर्तिकार साचे भाडे तत्त्वानेच घेणे पसंत करतात. परंतु, या सार्यांच्या दरामध्येही वाढ झाली असून यावर्षी तीन हजार रुपये दिवसाप्रमाणे मूर्तिकारांना भाडे मोजावे लागत आहे. उत्पन्न व खर्चाचा मेळ बसवताना मूर्तीकारांना आर्थिक ताण सोसावा लागत आहे. श्री गणेशाची मूर्ती शंभर रुपयांपासून पाच हजार रुपयापर्यंत उंचीवर दर आहे पेनच्या गणपतीला विशेष मागणी असून करकंब,अनगर, मिळत व स्थानिक अकलूज मधून गणेश मूर्ती मोठ्या प्रमाणावर विक्री झाल्या आहेत त्याचबरोबर सजावटी साहित्य महालक्ष्मीचे मुखवटे खेळणी इलेक्ट्रिक लाईट माळा शोभियवंत फुलझाडांच्या माळा मोठ्या प्रमाणावर विक्रीस आले आहे