मोडनिंब – मोडनिंब (ता. माढा) येथील श्री यमाई देवी मंदिर येथे कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून १०१ महिलांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यमाई देवी मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने या महाआरतीचे आयोजन करण्यात आले.ट्रस्टच्या आवाहनाला प्रतिसाद देत महिला उपस्थित होत्या. महिलांच्या हस्ते महाआरती करून स्त्री शक्तीचा जागर असल्याचे उपस्थित महिलांनी सांगितले. श्री यमाई देवी मंदिर ट्रस्टच्या म ध्यिमातून सतत विविध प्रकारचे सामजिक कार्यक्रम घेतले जातात. या महाआरतीच्या माध्यमातून महिलांनी स्त्रीशक्तीचा जागर करून स्त्रीशक्तीचा संदेश दिला.श्री यमाई देवी मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून महिलांच्या सहभागातून सतत विविध सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात. यावेळी यमाई देवी महिला मंडळाच्या सदस्यांसह अनेक महिला भक्त उपस्थित होत्या. यावेळी यमाई देवी महिला मंडळ उपस्थित होते. श्री यमाई देवी महिला मंडळाच्या पुढाकारातून परिसरात विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम राबविले जातात.
श्री यमाई देवी मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून विविध सामाजिक, धार्मिक उपक्रम राबविले जातात. नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले जाते. तसेच अन्नदान, रक्तदान शिबिरे तसेच नवरात्रोत्सवात महिलांसाठी दररोज दोन पैठणींचा लकी ड्रॉ घेण्यात आला. तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांना नारीशक्ती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.




















