सोलापूर – प्रभुचे कोणतेही नाव घेवून नामस्मरण केल्यास ती साधना होते. असे प्रतिपादन ज्येष्ठ निरूपणकार विवेकजी घळसासी यांनी केले. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर आणि आर्यन क्रिएशन यांच्या संयुक्तविद्यमाने तीन दिवसीय विवेकाची अमृतवाणी या प्रवचनमालेतील दुसर्या दिवशी साधना या विषयावर ते बोलत होते. शनिवार दि.31 ऑक्टोंबर 2026 रोजी सकाळी 6.25 वा. अॅम्फी थिएटरमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला रसिक श्रोत्यांनी मोठी गर्दी केली होती.
अंतःकरण शुध्दी ही एक साधना आहे. मन बुध्दी सशक्त असावी. साधना केली की लगेच त्याचे फळ पाहिजे अशी भावना न ठेवता, संयम ठेवला पाहिजे. निस्वार्थ साधनेचीच फलप्राप्ती होते. सुख-दुःख हे क्षणभंगुर आहे. मन समाधानी असावे. प्रत्येक श्वास हा नामस्मरणाला सर्मपित केला पाहिजे. अहंकाराचा त्याग करता आला पाहिजे. ह्दयात राम असेल तर मनातील विष देखील अमृत होते. आणि अग्नी सुध्दा शीतल होतो. अंतःकरणात प्रभुला स्थायी रूपात ठेवणे ही साधना आहे. जीवनात आपल्या वाट्याला आलेली भूमिका प्रत्येकाने योग्य बजावली पाहिजे. आसक्ती अहंकारातून मोकळा झाला की स्वतंत्र्य होतो. नामस्मरणासाठी वेगळे काही करावे लागत नाही. असेही निरूपणकार विवेकजी घळसासी यांनी सांगितले.
प्रारंभी अॅटलान्सचे सुबोध भुतडा, आर्यन क्रिएशनचे विनायक होटकर यांच्या हस्ते निरूपणकार विवेकजी घळसासी यांना पुष्पहार अर्पण करून निरूपणाला सुरूवात करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या अध्यक्ष रेणुका महागांवकर, कार्याध्यक्ष प्रशांत बडवे, कार्यवाह जितेश कुलकर्णी, अविनाश महागांवकर, भाजपाचे शहाजी पवार, गुरूशांत धुत्तरगांवकर, रमेश कोल्हापुरे, सुयशचे केशव शिंदे, डॉ.किरण पाठक, ज्येष्ठ विधिज्ञ धनंजय माने, पु.ना. गाडगीळचे जितेंद्र जोशी यांच्यासह रसिक श्रोत्यांनी मोठी गर्दी केली होती. अॅम्फी थिएटरच्या खुर्च्या कमी पडल्या म्हणून रसिकांनी मिळेल त्या जागेवर आणि पायर्यावर बसून तर काहीजणांनी उभे राहूनच निरूपणकार विवेक घळसासी यांच्या रसाळवाणीतील व्याख्यान एैकले. रविवार दि. 1 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 6.25 वाजता सिध्दी या विषयावर निरूपण होवून तीन दिवसीय विवेकाची अमृतवाणीचे यंदाच्या वर्षी सत्र समारोप होणार आहे.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...




















