मंद्रुप – सालाबादाप्रमाणे यंदाही मंद्रुपचे ग्रामदैवत सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात संपन झाली. यात्रा कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गुरूवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी मंदिराचे पुजारी सकळेश्वर पुजारी व समर्थ पुजारी यांच्या हस्ते ‘श्री’ स महारुद्राभिषेक करण्यात आला. रात्री वीणा उभारून ओम नम: शिवायचा जप करण्यात आला. तसेच रात्री भजन कार्यक्रम पार पडला. शुक्रवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता मंदिरापासुन मुख्य रस्त्यावरुन श्रीच्या मूर्तीची सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली.
भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष शिवराज कालदे व शिवसेना नेते संतोष बरूरे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी पंचायत समिती मळसिध्द मुगळे, माजी सभापती गुरूसिद्ध म्हेत्रे, रामचंद्र वाडकर, निवृत्त ग्रामसेवक शैलेश मुंजे, सुरेश जोडमोटे, प्राचार्य बसवराज घाटे, विंचुरे सर, निम्बर्गीचे ग्रामसेवक नागेश जोडमोटे आदी उपस्थित होते.
माजी सभापती गुरूसिद्ध म्हेत्रे यांच्याकडून महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. यात्रा पार पाडण्यासाठी गौरीशंकर मेंडगुदले, सतीश मेंडगुदले, गंगाधर हिरेमठ , काशिनाथ जेऊरकर, महादेव जकुणे, सूर्यकांत मेंडगुदले, अशोक वाडकर, सुमित मेंडगुदले , मरूळाराध्य हिरेमठ, महादेव शिंगाडे, संदिप मेंडगुदले, महेश मेंडगुदले, अप्पू हसापुरे , गिरीष मेंडगुदले, नागनाथ मेंडगुदले, भिमाशंकर मेंडगुदले, शिवानंद मोकाशी, शिवानंद जोडमोटे, म्हाळप्पा घाले आदींनी परिश्रम घेतले.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...






















