सोलापूर : शिक्षक दिनाचे औचित्य साधून सोलापूर आचिव्हर्स राऊंड टेबल १८७च्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १२ शिक्षकांचा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. सन्मानपत्र, रोप व भेटवस्तू देऊन शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष सप्रेम कोठारी, सचिव साहिल कटारे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. संस्थेच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची माहिती अध्यक्ष सप्रेम कोठारी यांनी दिली.यावेळी डॉ. सुरेश ढेरे, किरण चव्हाण, हनुमंत राऊत, संतोष सुतार, नागेश फुलारी, शिवशरण बिराजदार, अविनाश बाणेगाव, शिवानंद तेगिनकेरी, रुचिरा गोडबोले, राशी कार्वेकर, कल्याणी पाटील आणि सोनम निचाणी यांचा गौरव करण्यात आला.
संस्थेतर्फे गरजू शाळांसाठी वर्गखोल्या बांधणे, स्लॅबची सुविधा, आरओ प्युरिफायर, प्रकाशयोजना, स्पोर्ट्स किट तसेच शालेय साहित्य देण्याचे उपक्रम राबविले जातात. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शर्वरी कोठारी यांनी केले. आयोजन यश निचाणी यांनी केले, तर धनंजय गोडबोले यांनी आभार मानले.
Post Views: 30