बार्शी – महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर श्री. एम. एस. शर्मा यांचे मार्गदर्शनाखाली व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर श्री. अमोलकुमार देशपांडे यांचे सहकार्याने, बार्शी तालुका विधी सेवा समिती, बार्शी व वकील संघ बार्शी यांच्या संयुक्त विदयमानाने तसेच अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती बार्शी तथा जिल्हा न्यायाधीश १ श्री. सुरज व्ही. केंद्रे यांचे अध्यक्षतेखाली बार्शी न्यायालयात आयोजित केलेल्या राष्ट्रीय महालोकअदालतीत ३४०९ प्रलंबित दिवाणी तसेच तडजोडपात्र फौजदारी खटले व दाखलपूर्व ४३५५ असे एकुण ७७६४ इतकी प्रकरणे राष्ट्रीय महालोकअदालतमध्ये तडजोडीने मिटवून त्यात सुमारे प्रलंबित प्रकरणात अनुकमे २ कोटी ७२ हजार ४१ रुपये व दाखलपुर्व प्रकरणांत ६२ लाख २४ हजार ६५० रुपयांची वसुली झाली. या राष्ट्रीय लोकअदालतीत बार्शी न्यायालयात प्रलंबित असलेले दिवाणी व फौजदारी असे ३४०९ व दाखलपूर्व ४३५५ असे एकुण ७७६४ प्रकरणे लोकअदालत पॅनलमध्ये तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. या लोकअदालतीमध्ये बार्शी न्यायालयातील एकुण सहा पॅनल करण्यात आले होते. त्यात जिल्हा न्यायाधीश १ श्री. सुरज व्ही. केंद्रे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ श्री. आर. एस. रोटे, अति. सह जिल्हा न्यायाधीश, बार्शी, श्री. पी. डी. सुभेदार, सह दिवाणी न्यायाधीश व स्तर, बार्शी श्रीमती व्ही. व्ही. चव्हाण, सह दिवाणी न्यायाधीश क स्तर श्रीमती पी. व्ही. राऊत, ३ रे सह दिवाणी न्यायाधीश क स्तर श्रीमती आर.पी. बागडे असे एकुण सहा पॅनल होते. तसेच २रे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर श्रीमती एस. एस. सुके यांचे गुन्हा कबुलीचे विशेष न्यायालय चालू ठेवण्यात आले होते. विशेष बाब म्हणजे पॅनल क. ३ श्री. पी. डी. सुभेदार, अति. सह जिल्हा न्यायाधीश, बार्शी यांचे पॅनलसमोरील एका वयोवृध्द पक्षकारास चालता येत नसल्यामुळे न्यायाधीश यांनी न्यायालयाच्या बाहेर जावून त्यांचे व्हेरिफिकेशन घेवून तडजोडीने प्रकरण निकाली केले. तसेच सदरच्या पॅनलमध्ये दुसरी एक वयोवृध्द पक्षकार श्रीमती लक्ष्मी तुकाराम अवचार या वयोवृध्द महिलेची आपुलकीने विचारपूस करुन सदर प्रकरण तडजोडीने निकाली काढण्यात आले. जिल्हा न्यायालयातील मोटार अपघात प्रकरणांत एकुण २ प्रकरण तडजोडीने मिटून त्यात सुमारे रुपये ३३,००,०००/- इतक्या रक्कमेची नुकसान भरपाई मंजुर करण्यात आली. एन. आय. ॲक्ट १३८ च्या एकुण १४ प्रकरणांत तडजोड होवुन त्यात सुमारे ४१ लाख २२ हजार ४६२ रुपयांची वसुली, तर रक्कम वसुलीच्या १ प्रकरणांत तडजोड होवुन त्यात २ लाख ६२ हजार २७६ रुपयांची वसुली झाली. न्यायालयातील प्रलंबित कबुलीची ११६ प्रकरणे तडजोडीने निकाली करण्यात आली. त्यात सुमारे २ लाख ५ हजार ५०० रुपयांची दंड वसुल करण्यात आला.
सदर लोकअदालतीमध्ये पक्षकारांनी मोठया प्रमाणांत सहभाग नोंदविला. राष्ट्रीय महालोकअदालतमध्ये यशस्वी करणेकामी बार्शी वकील संघाचे अध्यक्ष रणजित गुंड, पॅनल विधीज्ञ, सर्व न्यायालयातील कर्मचारी, पोलीस कर्मचारी, बँका तसेच फायनान्स कंपन्या, पंचायत समिती बार्शी, वीज वितरण कंपनी यांचे प्रतिनिधी यांचे विशेष सहकार्य लाभले.
Post Views: 31