सोलापूर : बेगमपेठ परिसरातील अल जामीयातुल हनफिया व रिजविया मदरसा येथे इदेमिलाद निमित्त विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. जाहीद अली खान होते व प्रमुख पाहुणे म्हणून श्री. फैज इनामदार, अमजद सालार, नासीर आळंदकर, कलाम पिरजादे, हाजी इस्माईल कुरेशी, हाजी कुतबुध्दीन शेख, उमर सालार उपस्थित होते.
मोहम्मद पैगंबर यांच्या जिवनावर आधारीत वक्तृव स्पर्धेत सोलापूर शहर व जिल्हयातील २५ मदरसाचे विद्यार्थ्यांनी भाग घेतला. महम्मद पैगंबर यांनी समाजासाठी दिलेले योगदान, जिवन चरित्र यावर विद्यार्थ्यांनी बुलंद आवाजात भाषण देवून समोर बसलेले असंख्य लोकांची मन जिंकली. काही विद्यार्थ्यांनी नातशरिफ गाऊन प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.श्री. फैज इनामदार यांनी मदरसाची प्रगती बद्दल माहिती देत विद्यार्थ्यांना धार्मीक शिक्षणा बरोबर मराठी भाषा, इंग्रजी भाषा व दैनंदिन शिक्षणा सोबत संगणक ज्ञान, प्रत्येक विद्यार्थ्याला देण्यासाठी सोलापूर शहर व जिल्हयातील सर्व मदरसा चालकांना आव्हान केले.वक्तृत्व स्पर्धेसाठी पहिले बक्षिस मोहम्मद तौकीर अ. रहेमान शेख रुपये ३०००/- व दुसरे बक्षिस अलतमश जिलानी कुरेशी रुपये २०००/-तिसरे बक्षिस मोहम्मद फैसल अलीअसगर शेख रुपये १०००/- आणि कन्सोलेशन बक्षिस अ. रजाक मुल्ला व अली चाँद शेख यांना देण्यात आले.
या कार्यक्रमात हाफीज फौजदार, हाफीज अमिनोद्दीन, हाजी अब्दुल गफुर, उमर फारुक, हाजी गुलाम मुस्तफा, हाफीज बाकर, रिझवान शेख, जिलानी, हाजी बिलाल कुरेशी, यांचा शाल देवून सन्मान करण्यात आला.
स्पर्धा बक्षिसपात्र विद्यार्थी निवडणेसाठी जज्ज म्हणून डॉ. अहतेशाम नदाफ, इलियास शेख, इरफान कारीगर यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन हाफीस तनवीर यांनी केले व आभार प्रदर्शन नासीर आळंदकर यांनी केले.
Post Views: 38