सांगोला – सह्याद्री कॉलेज ऑफ फार्मसी, मेथवडे (ता.सांगोला) येथे बी व डी.फार्मसी अंतिम वर्षाच्या विद्यार्थिनीचे सहानुभूतीसह महिला रोजगारक्षमता व कौशल्य विकास या ४० तासांच्या प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याचे उदघाटन नांदी फौंडेशन, पुणेच्या तंज्ञ प्रशिक्षिका लक्ष्मी मुळे, संस्थेच्या अध्यक्षा अनिता दिलीपकुमार इंगवले, विश्वस्त विश्वजीत दिलीपकुमार इंगवले, प्राचार्य डॉ.मनोजकुमार पाटील, ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाचे प्रा.एस.एस.काळे, प्रा.एस.पी.जोकार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने झाले. हि कार्यशाळा महिंद्रा प्राईड क्लासरूम अंतर्गत लक्ष्मी मुळे यांनी घेतली. या प्रशिक्षण कार्यशाळेत विविध उद्योग समूह व कंपन्यांमध्ये नोकरीला सामोरे जाताना येणाऱ्या अडचणी व त्यास कशा रीतीने सामोरे जावे, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाबरोबरच मुलाखत कौशल्य, इंग्रजी भाषेचा प्रभावी वापर, प्लेसमेंट स्किल, गटचर्चा, व्यवसाहिक नीतिशास्त्र, मौलिक कौशल्ये, प्रभावी सामाजिक माध्यमाद्वारे स्वतःस सादर करायचे कौशल्य, व्यवसाय शिष्टाचार, मुलाखतीचे प्रकार आणि कौशल्य, वैद्यकीय ज्ञान आणि निर्णय समर्थन प्रणाली, फार्मा कोअर क्षेत्रांचा परिचय या विषयावर मार्गदर्शन प्रात्यकक्षिकासह विद्यार्थिनींना देण्यात आले. सहभागी विद्यार्थिनीना उपस्थिती प्रमाणपत्राचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.