सांगोला – महाविद्यालयात प्रबोधनकार ठाकरे यांची १४१ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे सहसचिव साहेबराव ढेकळे यांच्या हस्ते प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष गणित विभाग प्रमुख प्रा.आर.डी.माहिमकर यांनी प्रबोधनकार ठाकरे यांनी समाजातील अंधश्रद्धा, रूढी-परंपरा आणि सामाजिक विषमतेविरुद्ध जनजागृती करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यांच्या विचारांची आजच्या समाजातही गरज असल्याचे मनोगतात नमूद केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्र.कार्यालयीन अधिक्षक विलास माने यांच्या मार्गदर्शनाखाली जयंती, पुण्यतिथी उपक्रम आयोजन समितीचे प्रमुख डॉ.जमीर तांबोळी, प्रशासकीय कर्मचारी शंकर माने, राहुल ढोले व बापू इंगोले यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.