सोलापूर – क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत सोलापूर महानगरपालिका क्रीडा अधिकारी यांच्यामार्फत आयोजित केलेल्या नेहरू हॉकी स्पर्धेत सहस्रार्जुन प्रशालेच्या मुलींच्या संघाने यंदाच्या वर्षीही आपले वर्चस्व कायम राखत दिमाखदार विजय मिळवला आहे.
नेहरूनगर येथील शासकीय मैदानावर झालेल्या अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात सहस्रार्जुन प्रशालेने आय.एम.एस. इंटरनॅशनल स्कूलचा २-० अशा एकतर्फी गोलफरकाने पराभव केला. प्रशालेच्या शेषाद्री मोघे हिने १ गोल तर तपस्या झिपरे हिने १ गोल करत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. संपूर्ण सामन्यात सहस्रार्जुनच्या खेळाडूंनी आक्रमक आणि उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन घडवत उपविजेत्या संघाला कोणतीही संधी दिली नाही.
संघास क्रीडा शिक्षक डॉ. उज्ज्वल मलजी, राघवेंद्र बळेभावी आणि राहुल पवार यांचे मार्गदर्शन लाभले. खेळाडूंच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष राजूसा भुमकर, सचिव गजाननसा गोयल, सदस्य अनिल रंगरेज, रामूसा पवार, मुख्याध्यापक मोरेश्वर काटवे, मुख्याध्यापिका मंजुषा काशीद यांनी सर्व यशस्वी खेळाडूंचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करून पुणे विभागीय स्पर्धेस सदिच्छा दिल्या.
—–
विजयी संघातील खेळाडू
संघनायक कल्याणी नागणसूरे, गोलकीपर श्रेया हाऊजी, पूर्वा हक्के, रूपा सुतार, तपस्या झिपरे, शेषाद्री मोघे, वर्षाराणी गोरकल, श्रावणी गंदुरे, श्रुती मिश्रा, संस्कृती माखणे, दृष्टी बसले, अंकिता पारवे, अक्षता बुद्याळ, संस्कृती वायकर, शुभांगी पुपल आणि कार्तिकी शिंदे.




















