सोलापूर : अभियंता दिनाच्या निमित्ताने अभियंत्यांचा गौरव करण्याची परंपरा जपत लायन्स क्लब ऑफ सोलापूर सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून दिलेले लायन्स अभियंता गौरव पुरस्कार मोलाचे आहेत कारण देशाच्या विकासात आणि राष्ट्रउभारणीत देशातील अभियंत्यांनी उल्लेखनीय योगदान दिलेले आहे असे प्रतिपादन स्वामी समर्थ सूत मिलचे चेअरमन राजशेखर शिवदारे यांनी केले.श्री.शिवदारे यांनी केले.
लायन्स क्लब ऑफ सोलापूर व लिओ क्लब ऑफ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने अभियंता दिनाचे औचित्य साधून ‘लायन्स अभियंता गौरव पुरस्कार’ सोहळ्याच्या प्रसंगी ते बोलत होते. आपल्या मनोगतात भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या अतुलनीय कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला.प्रारंभी लायन्स क्लब ऑफ सोलापूरचे अध्यक्ष मंजुनाथ दर्गोपाटील यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविकात लायन्सच्या कार्याची माहिती दिली. अकबर मुल्ला यांनी अतिथीचा परिचय करून दिला. हॅच फ्री मेसोनिक हॉल, सोलापूर येथे उत्साहात संपन्न झालेल्या या सोहळ्यात राजशेखर शिवदारे यांच्या हस्ते इंजि. सुमित कांकरीया, इंजि. परिमल शहा, आर्कि. उमेश हेडगीरे, इंजि. अविनाश बिडवे आणि इंजि. सुशांत माशाळकर यांना अभियंता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल शाल, श्रीफळ , हार व सन्मानपत्र देऊन लायन्स अभियंता गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. अण्णासाहेब कोतली, संतोष काबरा, सुनील पाचकवडे, श्रीकांत सोनी व महेश कारंडे यांनी पुरस्कार प्राप्त अभियंत्याचा परिचय करून दिला.
सूत्रसंचालन सेवाकार्य प्रमुख इंजी. भगवान जाधव यांनी केले तर सचिव विकास पाटील यांनी आभार व्यक्त केले. यावेळी क्लब मधील अभियंत्यांचाही सन्मान करण्यात आला. प्रांतपाल राजेंद्र शहा कासवा यांनी या कार्यक्रमास समयोचित शुभेच्छा दिल्या. यावेळी कोषाध्यक्ष धनराज कोरे-पाटील, लिओ क्लबचे अध्यक्ष लिओ उज्वल सावळगी, झोन चेअरमन अमिता कारंडे, रंजना शहा, अभय सुराणा, रमेश जैन, कल्पेश मालू , सुरेश जाजू , नरेंद्र गंभिरे, बसवराज कुलकर्णी, संतोष चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
Post Views: 16