अकलूज – श्री जयसिंह मोहिते पाटील विद्यालय, संग्रामनगरच्या खेळाडूंनी जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत दमदार कामगिरी केली. बुधवार, दि. १६ रोजी सदाशिवराव माने विद्यालय, अकलूज येथे झालेल्या जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत शाळेच्या तीन खेळाडूंनी विविध वयोगटात अव्वल स्थान पटकावत पुणे येथे होणाऱ्या विभागीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी दिमाखात प्रवेश केला.
१९ वर्षे वयोगटात प्रावीण्या सुनील इंगळे आणि सरला रवि डुकरे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तर १७ वर्षे वयोगटात अनन्या संग्राम खरात हिने प्रथम क्रमांक मिळवत विभागीय स्पर्धेतील आपले स्थान निश्चित केले.
दरम्यान, शाळेच्या अन्य खेळाडूंनीही उल्लेखनीय कामगिरी बजावली. श्रद्धा गणेश पवार हिने १७ वर्षे वयोगटात तृतीय क्रमांक मिळवला. तसेच जोया मुसा मोमीन आणि सायली सागर मोरे यांनी १९ वर्षे वयोगटात द्वितीय क्रमांक पटकावला.
या जिल्हास्तरीय स्पर्धेत विद्यालयाचे एकूण नऊ खेळाडू सहभागी झाले होते. खेळाडूंना मुख्याध्यापक राजेंद्र फडतरे, क्रीडा शिक्षक सुभाष चव्हाण व सहशिक्षिका शाहीनबानू काझी यांचे मार्गदर्शन लाभले.
या उल्लेखनीय यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे मार्गदर्शक संचालक श्री. जयसिंह (बाळादादा) शंकरराव मोहिते-पाटील, अध्यक्ष संग्रामसिंह (अण्णासाहेब) जयसिंह मोहिते-पाटील, संचालिका स्वरूपाराणी (दिदीसाहेब) जयसिंह मोहिते-पाटील, सचिव अभिजित रणवरे, सहसचिव हर्षवर्धन खराडे-पाटील, पंचायत समिती सदस्या निशा गिरमे, सुमित्रा पतसंस्थेचे चेअरमन महादेवराव अंधारे तसेच यशवंत साळुंखे यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले असून, विभागीय स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या