अक्कलकोट – लायन्स क्लब ऑफ अक्कलकोट यांच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १७ आदर्श शिक्षकांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
लायन्स क्लब ऑफ अक्कलकोटचे अध्यक्ष ला. अभय खोबरे यांच्या हस्ते आदर्श शिक्षकांना पुरस्कार प्रदान करण्यात आला
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रांतपाल ला. MJF राजेंद्र शहा कासवा, झोन चेअरमन ला. स्वामीनाथ कलशेट्टी, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले अक्कलकोट,उपनगराध्यक्ष बंटी राठोड, चपळगावचे . रवी पाटील ला. दर्गो पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमास लायन्स क्लब ऑफ अक्कलकोटचे चेअरमन ला. राजेंद्र हत्ते, PDG ला. राजशेखर कापसे, ला. प्रभाकर मजगे, ला. मल्लीनाथ साखरे, सचिव ला. शिरीष पंडीत, ला. मल्लिकार्जुन मसुती, खजिनदार ला. विठ्ठल तेली, ला. शहीद वळसंगकर, ला. सुधीर माळशेट्टी, ला. चेतन जाधव ला. शिवशरण खुबा यांच्यासह क्लबचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक
विकास राऊत , प्रतिभा शटगार , रुद्राक्ष वैरागकर , सागर मतदेवरु ,. डॉ. ललिता हिंडोळे ,. शिवाजी साठे
रेखा पाटील . ‘ ,. प्रशांत शिंपी ,. सुषमा हंचाटे , अर्चना जाधव . ‘. शहनाज कुमठे ,. सोनल आळंद , नवनाथ बाबुराव गीरी ,. निलकंटेश्वर पाटील , आनंद सुतके , विलास तदैवाडी , सोनाली तोळणुरे आदिचा यावेळी यथोचित गौरव करण्यात आला
चौकट
शिक्षक हे समाजाच्या जडणघडणीतील महत्त्वाचे शिल्पकार असून विद्यार्थ्यांना केवळ ज्ञानच नव्हे, तर संस्कार, मूल्ये आणि जीवनाची योग्य दिशा देण्याचे कार्य ते करतात. अशा कर्तृत्ववान शिक्षकांचा सन्मान करणे म्हणजे त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासोबतच संपूर्ण शिक्षक वर्गाचा गौरव करण्यासारखे आहे. असे गौरवोद्गार ला अध्यक्ष अभय खोबरे यांनी काढले . चौकट पुर्ण
लायन्स क्लब ऑफ अक्कलकोटच्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. शिक्षकांच्या कार्याचा गौरव करून त्यांच्या योगदानाला सलाम करण्याचा हा प्रेरणादायी उपक्रम ठरला.
Post Views: 10